आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • What Youre, I Am Know Very Well Sharad Yadav Critised On Smruit Irani

तुम्ही काय आहात, ते मला ठाऊक आहे - राज्यसभेत स्मृती इराणींवर शरद यादवांची टिप्पणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राज्यसभेत सोमवारी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी जदयू अध्यक्ष शरद यादव यांना त्यांच्या दाक्षिणात्य स्त्रियांविषयीच्या वक्तव्यावरून धारेवर धरले. त्यावर इराणींशी वाद घालताना 'तुम्ही काय आहात, हे मला चांगलेच ठाऊक आहे,' अशी खोचक टिप्पणी यादव यांनी केली.

यादव म्हणाले, पृथ्वी दुभंगली तरी मी माझ्या वक्तव्यावर ठाम राहीन. या सभागृहात सावळ्या स्त्रियांबाबत काय-काय बोलले गेले आहे. त्यावर चर्चा व्हायला हवी.

आधीचे वक्तव्य : दाक्षिणात्य स्त्रिया सुंदर, बांधाही सुडौल
राज्यसभेत शुक्रवारी विमा विधेयकावर चर्चेत यादव म्हणाले, दाक्षिणात्य स्त्रियांच्या सौंदर्याप्रमाणे त्यांचा बांधाही सुडौल असतो. आमच्याकडे महिला तितक्याशा सुंदर नसतात, कारण दाक्षिणात्य स्त्रियांना नृत्यही येते.