आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजित पवार जेव्हा आपल्या कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नात दुचाकीवर पोहचतात....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अजित पवारांबाबत एक सांगितले जाते की ते वाद्याचे पक्के, ख-याला खरे म्हणणारे आणि खोट्याला तोंडावर सुनावणारे आणि कार्यकर्त्यांना संभाळणारे... शनिवारी पुन्हा एकदा त्याचा अनुभव झाला. शनिवारी सायंकाळी पुण्यातील सूस भागात लग्नसोहळ्याला जात असताना लग्नसमारंभामुळे मोठी वाहतूककोंडी झाली. अजित पवारांची गाडीही त्यात अडकली. मग अजितदादांनी लग्न गाठण्यासाठी शक्कल लढवत आपल्या चारचाकीतून खाली उतरत थेट दुचाकीस्वार बसून तेथे जाणे पसंत केले आणि आपल्या कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नाचा मुहूर्त गाठला. यानिमित्ताने अजित पवारांच्या वक्तशीरपणाचा आणि आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याचा अनुभव घेतला.

 

त्याचे झाले असे की, शनिवारी सायंकाळी पुण्यातील पाषाण भागातील सूस रोडवरील सनीज् वर्ल्ड या ठिकाणी पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांचे चिरंजीव हर्षवर्धन आणि माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांची पुतणी चि.सौ.का. किरण यांचा विवाहसमारंभ होता. लग्नाचा मुहूर्त सायंकाळी साडेसातच्या सुमारास होता. मात्र, शनिवारी दिवसभर अजित पवार कराड व सातारा भागात होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंत चव्हाण यांच्या 33 व्या पुण्यतिथीनिमित्त अजित पवारांसह राष्ट्रवादीचे सर्व नेते उपस्थित होते. याच दिवसाचे निमित्त साधून राष्ट्रवादीने भाजपविरोधात हल्लाबोल आंदोलनास प्रारंभ केला. हे आंदोलन अजित पवारांच्या उपस्थितीत पार पाडले. त्यानंतर ते कराड, सातारा परिसरात दिवसभर कार्यरत होते. मात्र, सायंकाळी आपला कार्यकर्ता भाऊसाहेब भोईर यांच्या मुलाच्या लग्नाला पोहचण्यासाठी निघाले होते. मात्र, नेहमीप्रमाणे शनिवारी सायंकाळी पाषाण भागात प्रचंड वाहतूककोंडी झाली. सूस रोड ते सनीज् वर्ल्ड दरम्यान लग्नासाठी आलेल्या शेकडो गाड्यात अजित पवारांचीही गाडी अडकली.

 

अजित पवार आल्याचे व वाहतूक कोंडीत अडकल्याचे कळताच कार्यकर्ते त्यांच्या दिशेने येऊ लागले. पुढे आणखी मोठी गर्दी असल्याचे कार्यकर्त्यांनी अजितदादांना सांगितले. मग त्यांनी विवाह सोहळ्याला वेळेत उपस्थित राहण्यासाठी आणि मंगलाष्टक गाठण्यासाठी आपली चारचाकी सोडून स्थानिक कार्यकर्ता विशाल वाकडकर यांच्या दुचाकीवर पाठीमागे बसून जाणे पसंत केले. आणखी एका गाडीत राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनाही असाच अनुभव आला. त्यांनाही मग नगरसेवक विनोद नढे यांनी आपल्या दुचाकीवर बसवून विवाहस्थळी पोहचवले.

 

अजित पवार विवाहस्थली दुचाकीवर आल्याचे पाहून लग्नसमारंभासाठी पोहचलेल्या हजारो लोकांना एकच धक्का बसला. मात्र, तोपर्यंत स्पीकरवरून वाहतूककोंडीतून अडकलेले व वेळेचे पक्के असलेले अजित पवार वेळेआधीच काही मिनिटे पोहचल्याचे सांगताच लोकांना हा प्रकार समजला. मात्र, यानंतर अजित पवारांच्या वक्तशीरपणाची चर्चा विवाह समारंभात रंगली. 

बातम्या आणखी आहेत...