मुंबई - कोणत्याही प्रवासाचे नियोजन करून त्याचे बुकिंग करताना ५४ टक्के भारतीय सवलतींना प्राधान्य देतात, तर विमान प्रवासासाठी विविध पॅकेज असणाऱ्या योजनांसाठी ३७ टक्के भारतीयांनी प्राधान्य दिल्याचे स्कायस्कॅनरच्या सर्वेक्षणात समोर आले आहे.
स्कायस्कॅनर या जागतिक स्तरावरील आघाडीच्या प्रवासविषयक सर्च इंजिनने केलेल्या या सर्वेक्षणात देशातील १००० जणांनी सहभाग नोंदवला. या संदर्भात स्कायस्कॅनर इंडियाच्या वरिष्ठ विपणन व्यवस्थापक कविता ग्यानमूर्ती यांनी सांगितले, देशातील ११६ दशलक्ष स्मार्टफोन धारकांकडे इंटरनेट आहे. यातील बहुतेक भारतीय प्रवासी आता पारंपरिक प्रवास आरक्षणाच्या पद्धती टाळून नव्या पद्धतींचा अवलंब करताहेत. वाढत्या तंत्रज्ञानामुळे प्रत्यक्ष प्रवास कंपनीच्या कार्यालयात जाऊन आरक्षण करणे असे दृश्य आता दुर्मिळ झाले आहे. आता २१ दशलक्ष भारतीयांपर्यंत क्रेडिट कार्ड पोहोचले आहे. त्याचाही वापर प्रवासाचे बेत आखताना मोठ्या प्रमाणात होत आहे.
पारंपरिक पद्धतींना फाटा, तंत्रावर भर
बहुतेक भारतीय प्रवासी सध्या इंटरनेट, मोबाइल अॅप व इतर माध्यमातून आलेल्या प्रवासविषयक सवलती, विविध सूट असणारे पॅकेज याचा शोध घेऊन त्यानुसार बेत आखतात. पारंपरिक पद्धतीला आता बराच फाटा बसतो आहे. सवलतींबाबत सखोल चौकशी करण्याबाबत प्रवासी चौकस असतात.
कविता ग्यानमूर्ती, वरिष्ठ विपणन व्यवस्थापक, स्कायस्कॅनर इंडिया.