आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चुकून दुसऱ्याच्याच गाडीत बसतात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री अहमदाबादमध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. पण अमित शाह यांची भेट घेऊन परतताना स्वतःच्या गाडीत बसण्याऐवजी मुख्यमंत्री चक्क दुसऱ्याच गाडीत बसले. 

 

 

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अहमदाबादमध्ये अमित शाह यांची भेट घेतली. मात्र, या बैठकीत केवळ गुजरात निवडणुकीबद्दलच चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अमित शहांची भेट घेऊन फडणवीस बाहेर पडताच त्यांना पत्रकारांनी गराडा घातला आणि प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. त्यामुळे पत्रकारांना चुकवत निघालेले फडणवीस हे घाईत चुकून दुसऱ्याच गाडीत जाऊन बसले. मात्र, गाडीत बसल्यावर ड्रायव्हर चुकीचा असल्याचे लक्षात आले आणि आपण दुसऱ्या गाडीत बसल्याचे मुख्यमंत्र्यांना समजले, त्यानंतर त्यांनी गाडीतून काढता पाय घेतला. 

 

 

अमित शाहांची भेट घेण्यासाठी अहमदाबादला जाण्यापूर्वी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. नारायण राणे यांनी या भेटीला दुजोरा दिला.  पण दोघांमध्ये काय चर्चा झाली याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. आगामी विधान परिषद पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...