आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When Did ‘Incredible India’ Become ‘Intolerant India’ For You? Kher Asks To Aamir

#Intolerance: अमिरच्या घराबाहेर हिंदू सेनेची निदर्शने, पोलिसांनी सुरक्षा वाढवली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मिस्टर परफेक्टनिस्ट अशी खात्यी मिळवलेल्या अभिनेता अमिर खानने भारतातील असहिष्णू वातावरणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नेटिझन्सच्या निशाण्यावर चांगलाच आला आहे. अमिर खानसारख्या प्रगल्भ अभिनेत्यांकडून भारतमातेबाबत असे वक्तव्य करणे चुकीचे आहे असा सूर सोशल मिडियातून उमटत आहेत. दरम्यान, अमिर खानच्या मुंबईतील घराबाहेर हिंदू सेनेने निदर्शने केली. पोलिसांनी हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे अमिर खानच्या घराबाहेर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.
या व्‍यक्‍तव्‍यामुळे भारताची प्रतीमा मलीन - केंद्रीय गृह राज्य मंत्री
आज (मंगळवार) दिल्लीच्‍या नवीन अशोक नगर पोलिस ठाण्‍यात एका लघू चित्रपट निर्मात्‍याने अमीर विरुद्ध तक्रार दिली. दरम्‍यान, भाजप नेते आणि चित्रपट क्षेत्रातील काही दिग्‍गजांनी अमीर विरुद्ध टीकास्‍त्र उपसले असून, अनेकांनी त्‍याची पाठराखणसुद्धा केली आहे. केंद्रीय गृह राज्य मंत्री किरण रिजिजू म्‍हणाले, ''अमीरच्‍या या वक्‍तव्‍यामुळे जागतिक पातळीवर देशाची प्रतीमा मलीन झाली आहे'', असे ते म्‍हणाले.
अमिर को डर नही, लोगों को डरा रहे है- भाजप
अमिर खान डरा नही है वो लोगों को डरा रहे है अशा शब्दांत भाजपने हल्लाबोल केला आहे. तसेच बोलाविता धनी वेगळा असून यामागे राजकारण असल्याची प्रतिक्रिया भाजपचे नेते शहनवाज हुसैन यांनी दिली आहे. भारत हा खरोखरच अतुल्य देश असून जगाच्या पाठीवर मुस्लिमांसाठी भारतासारखा सुरक्षित देश कोठेही नाही. या भारतानेच तुम्हाला सुपरस्टार बनवले आहे हे ही विसरू नये असे हुसैन यांनी अमिरला सुनावले. तुम्ही भारत सोडून गेल्यानंतर जगभरात तुम्हाला ख-या असहिष्णुतेचा प्रत्यय येईल असे सांगण्यासही हुसैन विसरले नाहीत.
अनुपम खेर यांचा हल्लाबोल-
दुसरीकडे, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी अमिर खानला चांगलेच फैलावर घेतले आहे. अतूल्य भारत असहिष्णू कधी झाला असा सवाल करीत मागील 7-8 महिन्यांतच भारत असहिष्णू कसा दिसू लागला असे टि्वट केले आहे. आणखी एक ज्येष्ठ नेते रजा मुराद यांनी अमिर खानची बाजू घेतली आहे. अमिर खान हा देशाचा नागरिक आहे. त्याला देशातील घडामोडीबाबत भाष्य करण्याचा सर्वाइतकाच अधिकार आहे. त्याच्या मताचा आदर करूया. त्याला उलट प्रश्न करण्यापेक्षा त्याला काय चुकीचे जाणवले हे विचारले पाहिजे असे रजा मुराद यांनी म्हटले आहे. अभिनेते व भाजपचे खासदार परेश रावल यांनी अमिरला परिस्थिती बदलण्याचे आवाहन केले आहे. भाजपने अमिर खानच्या वक्तव्याबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे. अमिर करोडो देशवासियांचा आवडता अभिनेता आहे त्याने आपल्या कृतीतून देशवासियांच्या मनात स्थान मिळवले आहे. मात्र, त्याच अमिरने हे वक्तव्य केले यावर विश्वास बसत नाही असे भाजपचे प्रवक्ते संबीत पात्रा यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीने अमिर खानची बाजू घेतली आहे.
एक व्यक्ती, एक नागरिक आणि या देशाचा एक भाग म्हणून आपण वर्तमानपत्रांतून वाचतो, टीव्हीवर पाहतो की काय घडतंय आजूबाजूला. त्यामुळे निश्चितपणे मी धास्तावलेलो आहे. त्याचा इन्कार करू शकत नाही. अनेक घटनांनी मला चिंतेत टाकले. मुलांच्या सुरक्षेबाबतच्या भीतीमुळे एकदा तर पत्नीने (किरण राव) भारतच सोडून जाऊ, अशी इच्छा व्यक्त केली होती, असे अमिर खानने रविवारी एका मुलाखतीदरम्यान वक्तव्य केले. यावरून पुन्हा एकदा भारतातील असहिष्णू वातावरणाबाबत चर्चेला तोंड फुटले आहे. मात्र, अमिर खान अनेक नेटिझन्सच्या निशाण्यावर आला आहे. काही बॉलिवूड मंडळींनी अमिरला नसीहत दिली आहे तर काहींनी त्याला पाठिंबा दिला आहे.
बुजूर्ग अभिनेते अशी ओळख असलेल्या अनुपम खेर यांनी अमिर खानला फटकारले आहे. खेर यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे की, अमिर, तू सत्यमेव जयते'मधून समाजातील अनिष्ट प्रथांवर प्रकाश टाकला. त्याद्वारे तू लोकांमध्ये आशेचा किरण निर्माण केला. मग आताच्या 'असहिष्णू' काळात तू समाजात भीती न पसरवता लोकांना आशा दाखवली पाहिजे. जर भारत असहिष्णू बनला आहे, असे मानले तरी तर तू लाखो भारतीयांना देश सोडण्यास सांगाल की आहे ती स्थिती बदलण्यासाठी प्रयत्न कराल किंवा त्याची वाट पहाल. या देशाने यापूर्वीही अनेक वाईट घटना व प्रसंग पाहिले आहेत. त्यावेळी देश सोडण्याचा का विचार केला नाही असा सवाल करीत तू पत्नी किरण राव हिला विचार की कोणत्या देशात तूला राहायला आवडेल? आणि याच देशाने तूला 'आमिर खान' बनवले आहे, हे तिला सांगितलं आहेस का असा टि्वटचा भडिमार करीत अमिरला फटकारले आहे.
तस्लिमा नसरीन यांनी अमिर खानला सुनावले आहे. जगभरच आपण कमी किंवा अधिक असहिष्णूतेला बळी पडत असतो. भारतासारखा देशच अमिर खान व त्याच्या कुटुंबियाला अधिक सुरक्षित देश आहे. माजी क्रिकेटर नवज्योतसिंग सिद्धू यांनीही अमिर खानच्या वक्तव्यावर टीका केली आहे.
एका हिंदूबहुल देशात शाहरुख, आमीर आणि सलमान हे सुपरस्टार आहेत. त्यामुळे मला समजत नाही की देशात असहिष्णुता कशी?, असा परखड सवाल सिनेदिग्दर्शक राम गोपाल वर्माने केला आहे. हिंदूंची संख्या सर्वाधिक असलेल्या देशात तीन मुसलमान सुपरस्टार आहेत, हाच सर्वात मोठा पुरावा आहे की, देश असहिष्णू नाही, असे ट्वीट त्याने केलं आहे.
पुढे वाचा व पाहा, अनुपम खेर, रामगोपाल वर्मा, परेश रावल, ऋषी कपूर, रवीना टंडन, क्रिकेटर रवींद्र जडेजा यांनी अमिरला उद्देशून केलेली टि्वट्स...