आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेब ठाकरेंच्या भेट घेतल्याने नाराज झाल्या होत्या सोनिया गांधी; प्रणव मुखर्जींचा खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- २०१२ च्या राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र, त्यामुळे सोनिया गांधी नाराज झाल्या होत्या, असा गौप्यस्फोट माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या ‘द कोअलिशन इयर्स’ या पुस्तकात केला आहे.  ‘एनडीएत असूनही शिवसेनेने माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे ठाकरेंची भेट घ्यायलाच हवी, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मला दिला हाेता. मात्र साेनियांना ते अावडले नव्हते,’ असे मुखर्जींनी पुस्तकात नमूद केले अाहे.

'शक्य असेल तर बाळासाहेबांची भेट टाळा.'
प्रणब मुखर्जी यांनी सोनिया गांधी यांच्याशी बाळासाहेब यांच्या भेटी संदर्भात चर्चाही केली होती. मातोश्रीवरून भेटीचे वारंवार मेसेजही येत होते. परंतु, बाळासाहेबांची भेट घ्यावी, याबाबत सोनिया गांधी सकारात्मक नव्हत्या. त्या म्हणाल्या, 'शक्य असेल तर बाळासाहेबांची भेट टाळा.'

बाळासाहेबांना नाराज करू इच्छित नव्हतो...
प्रणब मुखर्जी यांनी सांगितले की, मी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांची भेट घ्यायला हवी, असा सल्ला राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सल्ला दिला होता. बाळासाहेब आणि त्यांचे समर्थक राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची प्रतिक्षा करत असून त्यांनी स्वागताची जय्यत तयारी केली आहे. मुंबईत आले आहात आणि बाळासाहेबांची भेट घेतली नाही तर त्यांचा अपमान केल्यासारखे होईल, असेही पवार म्हणाले होते. त्यामुळे सोनिया गांधी यांची परवानगी न घेता बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. कारण मी त्यांना अपमानित करू इच्छीत नव्हतो. त्यामुळे मी शरद पवार यांना आग्रह केला आणि त्यांनी मला एअरपोर्टहून थेट मातोश्रीवर कारमधून सोडले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... यामुळे नाराज झाल्या होत्या सोनिया गांधी...
बातम्या आणखी आहेत...