आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When Sachin Tendulkar Had No Money In Pocket To Go Home From The Railway Station

सचिनच्‍या खिशात एक रुपयाही नव्‍हता, स्‍टेशनवरून घरी गेला होता पायी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतातील सर्वात श्रीमंत क्रीडापटू म्‍हणून सचिन तेंडुलकरची ओळख आहे. पण, एक वेळ अशीही आली होती की त्‍याच्‍या खिशात एक रुपयाही नव्‍हता. त्‍यामुळे दादर स्‍टेशनपासून ते शिवाजी पार्कपर्यंत त्‍याला पायी जावे लागले होते, हा किस्‍सा स्‍वत: सचिननेच मंगळवारी एका कार्यक्रमात सांगितला.
नेमके काय झाले होते...
> एका मोबाइल बँकिंग उद्घाटनाच्‍या कार्यक्रमात सचिनने हा किस्‍सा सांगितला.
> तो म्‍हणाला, ''त्‍या वेळी मी मुंबईच्‍या अंडर-15 टीममध्‍ये खेळत होतो.''
> माझे वय 12 वर्षे होते.
> मुंबई संघात निवड झाल्‍याने मी खूप उत्‍साही झालो होतो.
> पुण्‍यात आमच्‍या तीन मॅच होत्‍या.
> आम्‍ही पुण्‍याला गेलो. घरून मला काही पैसे मिळाले होते.
> पण, केवळ चार धावांवर मी धावचित झालो. माझे वय कमी असल्‍याने मी वेगाने पळू शकलो नाही.
> त्‍यानंतर ड्रेसिंग रूममध्‍ये येऊन मी खूप रडलो.
> या मालिकेत मला पुन्‍हा बॅटिंग करण्‍याची संधी मिळाली नाही; कारण पाऊस सुरू झाला.
> त्‍यामुळे आमचा संघ सिनेमा पाहायला आणि बाहेर जेवायला गेला.
> माझ्याकडचे सर्व पैसे मी खर्च केले.
> नंतर ट्रेनने मुंबईला आल्‍यानंतर माझ्याकडे एक रुपयाही नव्‍हता.
> दोन बॅग घेऊन मी दादर स्‍टेशनवर उतरलो.
> तिथून पायी शिवाजी पार्कपर्यंत गेलो.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, सांगितली ऐतिहासिक आठवण ...
संबंधित बातम्‍या -