मुंबई/पुणे- मुंबई हायकोर्टाने सोमवारी अॅम्बी व्हॅलीची लिलाव प्रक्रिया सुरु केली. अॅम्बी व्हॅलीच्या लिलावासाठी 37, 392 कोटी ही किमान किंमत ठरविण्यात आली. सहारा समूह सध्या आर्थिक संकटात असला तरी कधीकाळी हा देशातील आघाडीचा उद्योग समुह होता. सहारा समुहाचे अध्यक्ष सुब्रत रॉय यांचे यात महत्वपुर्ण योगदान आहे.
स्कूटरवर विकत होते बिस्किटे
- कधीकाळी गोरखपूर येथे सुरू केलेला सहारा समुह अल्पकालावधीतच अब्जावधीपर्यंत पोहचला होता. राजकारण, बॉलीवूड आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज या समूहाशी संलग्न होते.
- लंब्रेटा स्कूटरवर कधी काळी सुब्रत रॉय बिस्किटे विकत होते. ती स्कूटर आजही कंपनीच्या मुख्यालयात ठेवण्यात आली आहे.
- एक काळ असाही होता जेव्हा त्यांना एसबीआय बॅंकेने व्यापार सुरु करण्यास 5 हजाराचे कर्ज नाकारले होते. त्यानंतर त्यांनी मित्रासोबत एक चिट फंड कंपनी उभारली.
पाच, दहा रुपयाने सुरु केला व्यापार
- ‘सहाराश्री’ रॉय हे स्वत:ला ‘मॅनेजिंग वर्कर’ असे म्हणवून घेतात. त्यांना स्वत:ला मॅनेजिंग डायरेक्टर म्हणवून घेणे आवडत नाही.
- ते आपल्या ग्राहकांना केवळ 5 ते 10 रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगत.
- कमी रक्कम असल्याने लाखो लोकांनी त्यांच्या कंपनीत गुंतवणूक केली. त्यामुळे त्यांची कंपनी वेगाने वाढली.
- ही यशस्वी वाटचाल सप्टेंबर 2013 मध्ये थांबली जेव्हा सेबीने त्यांच्यावर लाखो गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याचा आरोप केला. त्यांची खातीही त्यानंतर गोठवण्यात आली.
दीड लाख कोटी रुपयांचा सहारा समुह
- सुब्रत रॉय जेलमध्ये जाण्यापूर्वी सहारा समुह हा दीड लाख कोटी रुपयांचा होता.
- 4799 ऑफिस, हाॅटेल आणि मॉल्स
- 12 लाख कर्मचारी
- 10 पेक्षा अधिक क्षेत्रांमध्ये कार्यरत
- 2010 मध्ये लंडन येथील हाॅटल ग्रॉसवेनॉर हाउस 3500 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले.
- 2012 मध्ये न्यूयॉर्क येथील प्लाजा हाॅटल 3100 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले.
- 2012 मध्येच न्यूयॉर्क येथील ड्रीम हाॅटल1200 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले.
- मुख्यालय लखनौ येथे असून 200 एकरावर सहारा हे शहर वसवण्यात आले आहे.
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती