आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमिनीतुन अचानक निघु लागला धूर, वाफ; चमत्कार समजुन सुरु झाली पूजा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कर्जत येथील एका मंदिराबाहेरील जमिनीतुन अचानक धूर आणि वाफ निघु लागली आहे. नागरिकांनी याला लगेच चमत्कार मानत पूजा-अर्चा सुरु झाली आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे तिथून जवळच दुर्गा देवीचे मंदिर आहे.

वैज्ञानिक तपासणार नेमके हे होण्यामागचे कारण
- जमिनीखाली असणाऱ्या वीजेच्या तारांमधुन स्पार्क निघत असल्याने ही घटना घडली असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे.
- या घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान त्वरित घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने एक खड्डा खोदला आहे. तेथे वीज वाहिनी अथवा ज्वलनशील पदार्थ आढळलेला नाही. 
- जमिनीच्या आतुन धूर आणि वाफ निघत होती. त्याचवेळी जमीन आणि माती तापलेली होती.
- अजुन हे नेमके का घडले याचे कारण समजले नसले तरी अंबामातेचा चमत्कार समजुन नागरिकांनी पुजा-अर्चा सुरु केली आहे.
- भूगर्भ वैज्ञानिक या घटनेचे नेमके कारण सांगु शकतात. त्यामुळे त्यांना येथे बोलविण्यात येणार आहे. 

स्लाईडमध्ये पाहा घटनेशी संबंधित फोटो
बातम्या आणखी आहेत...