आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्धव ठाकरेंची उडविली 'हेराफेरी' स्टाईल खिल्ली, नितेश राणेंकडून Video शेयर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नारायण राणेंचा विधान परिषदेतील पत्ता कट झाल्यानंतर त्याचा राग आता राणे समर्थक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर काढू लागले आहेत. राणेंच्या उमेदवारीला शिवसेनेने कडवा विरोध केल्याने त्यांचा पत्ता कट झाला व प्रसाद लाड यांना भाजपने उमेदवारी दिली. मात्र, उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारचा पाठिंबा काढण्याची धमकी देऊन राणेंना विधान परिषदेत जाण्यापासून रोखले. यावर भाष्य करणारा एक व्हिडिओ राणे समर्थकांनी सोशल मिडियात व्हायरल केला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ राणेंचे पुत्र व आमदार नितेश राणेंनी टि्वटरवर टाकत शिवसेनेला डिवचण्याची संधी सोडली नाही. 

 

हेरा फेरी चित्रपटात परेश रावल (बाबूभैय्या) आणि अक्षय कुमार यांच्यात घराच्या भाड्यावरून वाद होतानाचा एक सीन आहे. यात अक्षय कुमार परेश रावलला वारंवार घर सोडून देण्याची धमकी देत असतो. परेश रावल अक्षयला तू जा, घर सोडून जा, खुशाल जा असे सांगत डिवचत असतो. शेवटी अक्षय कुमार माघार घेत मी दोन वर्षाचे भाडं भरणार, मी घर सोडून जाणार नाही असे सांगत घरातच थांबतो. त्यावेळी बाबूभैया हा थोडाच घराबाहेर जाणार आहे अशी खिल्ली उडवितात. याच सीनचा व्हिडिओ मॉर्फ करून अक्षय कुमारच्या चेह-यावर उद्धव ठाकरेंचा चेहरा तर, परेश रावलच्या चेह-यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा मॉर्फ केला आहे. तर, शेजारी उभे असलेल्या सुनील शेट्टीच्या चेह-यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा चेहरा मॉर्फ केलेला आहे. 

 

नितेश राणेंनी हा व्हिडिओ टि्वटवरून शेयर केला असला तरी, आपण तयार केलेला नाही. मात्र ज्याने कोणी हा व्हिडिओ बनवला तो जिनियस आहे प्रसंगाला धरून असे त्यांनी टि्वट म्हटले आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियात हा सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारला आतापर्यंत अनेकदा सरकारमधून बाहेर पडण्याची व पाठिंबा काढण्याची धमकी दिली आहे. मात्र, गेल्या तीन वर्षापासून दोन्ही पक्ष सत्तेत आहेत व एकत्र नांदतच आहेत. मात्र, शिवसेना वारंवार भाजपला लक्ष्य करत आहे. खासकरून शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहांना लक्ष्य करत आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, नितेश राणेंनी शेयर केलेला मॉर्फ व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...