आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

का रे दुरावा: जेव्हा उद्धव ठाकरे- अमित शहा एकाच विमानात प्रवास करतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेल्या वर्षी विधानसभेच्या निमित्ताने भाजप आणि शिवसेना या दोन मित्रपक्षांची 25 वर्षाची युती तुटल्यानंतर या दोन पक्षातील विसंवादाचा सूर कायमच दिसून आला आहे. आता हा सूर व्यक्तीगत पातळीवर पोहचला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख दोन दिवसापूर्वी दिल्ली दौ-यावर होते. मंगळवारी दुपारी ते जेट विमानाने दिल्लीहून मुंबईकडे परतत होते. त्याचवेळी भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा हे दिल्लीत मुंबईकडे येण्यास विमानात बसले. उद्धव ठाकरे हे तेथे आधीच असल्याने अमित शहा येताच त्यांनी नमस्कार केला. त्यानंतर अमित शहा त्यांच्या जागी जाऊन बसले. पुढे हे दोन नेते दिल्ली-मुंबई प्रवासादरम्यान दोन तास एकाच विमानात प्रवास करीत होते. दोघांत केवळ दोन-तीन सिटचे अंतर होते. मात्र, त्यांनी एकमेंकांकडे नंतर ढुकूनही पाहिले नाही. त्यावेळी विमानात प्रवास करणारे प्रवाशांना एकच प्रश्न पडला होता तो म्हणजे का रे दुरावा... का रे हा अबोला...
भाजप-शिवसेना केंद्रासह राज्यात सत्तेत आहे. एवढेच नव्हे तर या महिन्याअखेर होणा-या विधान परिषद निवडणुकीतही दोन्ही पक्षांची युती झाली आहे. मात्र, 25 वर्षाची घट्ट मैत्री तोडल्यानंतर भाजप शिवसेनेच्या मनातून उतरला आहे. भाजपने पाठीत खंजीर खुपसला अशी खंत उद्धव ठाकरे नेहमीच खासगीत व्यक्त करतात. या सर्व घडामोडीमागे पक्षाध्यक्ष अमित शहाच होते हे कोणीही सांगण्याची गरज नाही. मात्र, सत्तेत एकत्र आल्यानंतर दोन पक्षातील व त्यांच्या नेत्यांतील विसंवाद दूर होईल अशी अपेक्षा होती. मात्र, विसंवादाचा सूर कायम आहे.
लोकसभेत, विधानसभेत भाजपच्या धोरणांना शिवसेनेने कधी उघड तर कधी अप्रत्यक्ष विरोध केला आहे. आता नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनातही शेतक-यांची बाजू घेताना फडणवीस सरकारला खिंडीत गाठले आहे.
बातम्या आणखी आहेत...