आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Where Was BCCI Chief Selector Sandeep Patil During Sachin Tendulkar\'s Farwell Test?

सचिनची निवृत्ती संदीप पाटीलमुळे? ऐतिहासिक कसोटीवेळी कुठे होते गायब?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सचिन तेंडुलकरची अखेरची कसोटी वानखेडे स्टेडियममध्ये जाऊन पाहता यावी. त्या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार व्हावे असे तुम्हा-आम्हाला वाटत होते. सर्व दिग्गज मंडळी, राजकीय नेते, बॉलीवूड स्टार, बीसीसीआय, एमसीए पदाधिकारी अन् लाखो-करोडो चाहत्यांच्या उपस्थितीत सचिनचा निवृत्तीचा सोहळा संपन्न झाला. मात्र यावेळी राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील गायब होते. त्यांची अनुपस्थिती खटकणारी होती त्यामुळेच संदीप पाटील गेले होते कुठे? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात भारत- पाकिस्तान एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाच्या निवडीच्याआधी अचानकपणे सचिनने वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. याबाबतचे पत्र त्याने बीसीसीआयकडे सुपूर्द केले होते. सचिनसारख्या महान खेळाडूने मैदानात सामना न खेळताच निवृत्ती घेण्याचा निर्णय त्याच्या चाहत्यांना धक्का देणारा ठरला होता. सचिनने इतका टोकाचा व तत्काळ निर्णय का घेतला असावा, असा प्रश्‍न त्यावेळी उपस्थित केला गेला.
त्याचदरम्यान माध्यमांतून बातम्या झळकू लागल्या. निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी संघनिवड होण्याच्या पूर्वसंध्येला सचिनशी फोनवर चर्चा करून त्याला निवृत्त होण्यास भाग पाडल्याचे वृत्त एका वाहिनीवर प्रसिद्ध झाले होते.
2015 साली ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड देशांत होणार्‍या वर्ल्ड कपसाठी संघबांधणी करण्यात येत असून त्यामध्ये ‘तू’ फिट बसत नाही. त्यामुळे वन डे क्रिकेटबाबतचा निर्णय घेऊन टाक असे संदीप पाटील यांच्याकडून सांगण्यात आल्याची बोलले गेले होते. त्यामुळेच सचिनने वन डे क्रिकेट मधून अचानक निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता, अशा चर्चा रंगत आहेत.
आणखी पुढे वाचा......
.