आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Who Beaten Congress MLA, They Face Action Chief Minister

काँग्रेस आमदाराला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई - मुख्‍यमंत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गोंदिया येथील काँग्रेस आमदार गोपाळदास अग्रवाल यांच्या मारहाणीचा विषय सोमवारी विधानसभेत गाजला. या मारहाणीबाबत मुख्यमंत्र्यांनी निवेदन करून कारवाईचा निर्णय जाहीर करावा, अशी मागणी विरोधकांनी केली. मात्र, मुख्यमंत्री नंतर विवेदन करणार आहेत, असे सांगून कामकाज रेटण्याच्या प्रकारामुळे विरोधक संतप्त झाले. यामुळे तीनदा सभागृह तहकूब करण्यात आले. शेवटी अग्रवाल यांना मारहाण करणाऱ्या आरोपींचा शोध सुरू असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर सभागृह शांत झाले.

दोन दिवसांपूर्वी अग्रवाल यांना भाजप नगरसेवक शिवकुमार शर्मा व राहुल श्रीवास यांनी मारहाण केली. या प्रसंगीचे सर्व पुरावे उपलब्ध झाले असून आरोपींचा शोध सुरू आहे. शर्माचे सदस्यत्व रद्द करण्याची बाब तपासून पाहण्यात येत आहे. अग्रवाल यांना मी स्वत: बोललो आहे, असे मुखमंत्र्यांनी सांगितले.

बाकीचे सर्व कामकाज बाजूला करून अग्रवाल यांचा विषय घ्यायला हवा, अशी विरोधकांची मागणी होती. विधानसभा अध्यक्षांनी हे मान्यही केले होते. मात्र, असे असूनही कामकाज उरकून घेण्यात येत असले तर योग्य नाही. विधेयकांवर चर्चा होणे गरजेचे असतानाही ते परस्पर संमत करण्यात येत असेल तर ती विरोधकांच्या हक्कांची पायमल्ली आहे. एवढी असहिष्णुता बरी नव्हे, अशी टीका आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केली.