आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट कोहलीची गर्लफ्रेंड कोण? 9 वीच्या परीक्षेत प्रश्न; भिवंडीतील शाळेचा प्रताप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (फाईल फोटो) - Divya Marathi
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (फाईल फोटो)
मुंबई- ठाण्यातील भिवंडी परिसरातील एका शाळेत 9 वीच्या परीक्षेत विराट कोहली आणि अनुष्का शर्मा बाबत एक प्रश्न विचारला आहे. मुलांना लेखी परीक्षेत प्रश्न विचारला गेला की, 'विराट कोहलीची गर्लफ्रेंड कोण आहे.' मुलांना प्रियंका, अनुष्का आणि दीपिका आदी अभिनेत्रीच्या नावाचा ऑप्शन दिला होता. सोशल मीडियात खूप वायरल होतोय पेपर. चाचा नेहरू हायस्कूलचा प्रताप...
- भिवंडी स्थित चाचा नेहरु हिंदी हायस्कूलमध्ये 13 ऑक्टोबरला 9 वीच्या वर्गात फिजिकल ट्रेनिंगची परीक्षा होती.
- 'रिकाम्या जागा भरा' (fill in the blanks) या सेक्शनमध्ये 6 वा प्रश्न होता की, विराट कोहलीची गर्लफ्रेंड कोण आहे?
- यात मुलांना प्रियंका, अनुष्का आणि दीपिका आदी अभिनेत्रीच्या नावाचा ऑप्शन दिला होता.
- सध्या हा पेपर सोशल मीडियात जोरदार वायरल होतोय.
- तर, पालकांचे म्हणणे आहे की, एखाद्या खेळाडूच्या खेळाबाबत प्रश्न विचारला तर ठीक आहे पण त्यांच्या खासगी आयुष्यातील व कुटुंबातील प्रश्न विचारण्याची काही गरज नाही. असे प्रश्न विचारून स्कूल प्रशासन काय हासील करू पाहते आहे.
- दरम्यान, शालेय प्रशासनाने यावर कोणतेही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, सोशल मिडियात वायरल होत असलेला फोटो...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...