आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Who Will Bring Raj And Udhao Thackeray Together To Ask About Alliance

राज-उद्धव बंधुंना प्रश्‍न विचारण्‍यासाठी एकत्र बसविणार कोण?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबत चर्चा करण्‍याची तयार दर्शविली आहे. एकत्र येण्‍याबाबत प्रश्‍नाचे उत्तर दोघांना एकत्र बसवूनच घ्‍यावे, अशी भूमिका मांडली. या भूमिकेनंतर महाराष्‍ट्राच्‍या राजकीय वातावरणात दोन्‍ही नेत्‍यांच्‍या एकत्रीकरणाची चर्चा सुरु झाली. पक्षप्रमुख झाल्‍यानंतर उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्‍या भुमिकेचे अनेक पैलू आहेत. पक्षाची भविष्‍यात वाटचाल कशी राहील, कोणत्‍या दिशेने पक्षात वरिष्‍ठ पातळीवर विचार होत आहे, हे सांगून अध्‍यक्ष म्‍हणून पक्षाच्‍या कार्यकर्त्‍यांपर्यंत संदेश पोहोचविण्‍याच्‍या दृष्‍टीने ही मुलाखत महत्त्वाची आहे. पुढील वर्षी लोकसभा तसेच महाराष्‍ट्र विधानसभेच्‍या निवडणुका होणार आहेत. त्‍यादृष्‍टीने काही ठराविक संकेतही उद्धव यांनी दिले आहेत. परंतु, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्‍हणजे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्‍याचा आहे. महाराष्‍ट्राच्‍या राजकारणात हे दोन नेते एकत्र असल्‍यास मोठे स्थित्‍यंतर पाहायला मिळू शकते. मात्र, एक अतिशय महत्त्वाचा प्रश्‍न निर्माण होतो तो म्‍हणजे, एकत्र येणार का, या प्रश्‍नाचे उत्तर विचारण्‍यासाठी दोघांना एकत्र बसविणार कोण?