आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जो तो आपल्या लायकीप्रमाणे वागतो - आर. आर. पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘राज ठाकरे यांच्या वक्तव्यांची चौकशी करण्याची गरज नाही. त्यांना काय बडबड करायची ती करू द्या, जो तो आपल्या लायकीप्रमाणे वागतो,’ अशी प्रतिक्रिया गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बुधवारी व्यक्त केली.
राज ठाकरे यांनी कोल्हापुरातील सभेत केलेली वक्तव्ये तपासणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यांनी ही तिखट प्रतिक्रिया दिली. पोलिस कशा कशाची चौकशी करणार? पोलिसांना तेवढेच काम नाही, असल्या गोष्टींवर वेळ खर्च करण्यापेक्षा पोलिस अनेक महत्त्वाची कामे आहेत, असेही त्यांनी
या वेळी सांगितले.

राज यांच्या रूपाने एकपात्री कलावंताची भर : कॉँग्रेस
महाराष्‍ट्रा तील नाट्यक्षेत्रात एकपात्री प्रयोग करणा-या कलावंतांची थोर परंपरा आहे. आता त्यात राज ठाकरे यांच्या रूपाने अजून एक भर पडली आहे, असा टोला कॉँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला. राज यांच्या राजकीय एकपात्री प्रयोगाचा राज्यव्यापी दौरा नुकताच सुरू झाला असून त्यामध्ये विडंबन व नकला तर आहेतच. मात्र, सोबतच आपल्यापेक्षा लायकीने कितीतरी मोठ्या असलेल्या नेत्यांच्या अशोभनीय भाषेतील टवाळ्यादेखील आहेत. मुळात या एकपात्री प्रयोगाच्या कथानकाची ब्ल्यू प्रिंट अद्यापही ते देऊ न शकल्याने संपूर्ण मनसे आता केवळ एक फार्स ठरला असल्याचे सावंत यांनी सांगितले. फुकटात उपलब्ध असलेल्या या कार्यक्रमाला राज ठाकरे यांनी तिकीट लावावे, जेणेकरून मनसेला भविष्यात कधी मांडवली करण्याची गरज भासणार नाही, असा टोलाही सावंत यांनी लगावला आहे.