आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Whole System In India Castist : Press Council Chairman Markandey Katju Stand

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतातील सगळीच व्यवस्था जातीयवादी : मार्कंडेय काटजू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातील प्राध्यापक, वकील, पत्रकार, प्रशासनातील अधिकारी आणि नेते अशी सर्व व्यवस्था जातीयवादी आहे. जातीयवादामुळे देश महासत्ता तर सोडाच उलट अतिमागास होऊन जगाच्या सत्तास्पर्धेतून बाजूला फेकला जाईल असे प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष न्या. मार्कंडेय काटजू यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठात शनिवारी आयोजित केलेल्या न्या. छगला व्याख्यानमालेत ते बोलत होते.

अण्णा हजारे व्यक्ती म्हणून प्रामाणिक आहेत. मात्र, त्यांच्या उपोषणांनी देशातील भ्रष्टाचार संपुष्टात येईल, असे मानणे भाबडेपणाचे होईल, असा युक्तिवाद काटजू यांनी केला. अरविंद केजरीवाल यांचा पक्ष कुणाचे प्रतिनिधित्व करतो, असा प्रश्न उपस्थित करत आम आदमी पक्षाची त्यांनी जोरदार खिल्ली उडवली.

भारतीय राजकारणात अजूनही जातींचे प्राबल्य असून गरीबच नव्हे, तर सुशिक्षित मध्यमवर्गीयसुद्धा उमेदवाराची जात पाहूनच मतदान करतात. देशातील 80 टक्के व्यवस्था जातीयवादी असून महत्त्वाची पदे जातींच्या लॉबिंगवरच मिळतात.

देशातील वाढता मध्यमवर्ग बाबा-बुवा, ज्योतीष यांच्या नादी लागला असून त्यांच्यामध्ये अंधश्रद्धेचे प्रमाण वाढत आहे. तरुणांना केवळ उच्च शिक्षण देऊन भागणार नाही, तर त्यांच्यात विज्ञानवादी दृष्टिकोन निर्माण करण्याची गरज असल्याचे काटजू या वेळी म्हणाले. संजय दत्तच्या शिक्षेबाबत काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला.