आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Ban Slaughter Of Only Cows And Bulls: Bombay High Court

राज्यात गोवंश हत्येवरच बंदी का? हायकोर्टाची सरकारला विचारणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - फक्त गोवंश हत्येवरच बंदी का घातली, बकर्‍यांसारख्या इतर प्राण्यांच्या हत्येवर बंदी का नाही, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला केली. राज्याबाहेर कत्तल केलेल्या गायी आणि बैलांचे मांस राज्यात आयात करण्याच्या धोरणावर विचार करावा, असेही न्यायालयाने सुचवले.

राज्य सरकारने अलीकडेच केलेल्या गोवंश हत्याबंदी कायद्यातील कलम ५ (ड) ला आव्हान देणार्‍या याचिकांवर सोमवारी न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे आणि न्यायमूर्ती ए. आर. जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ‘फक्त गायी, बैलांच्या हत्येवरच राज्य सरकारने बंदी का घातली? बकर्‍यांसारख्या इतर प्राण्यांचे काय?’ अशी विचारणा खंडपीठाने केली. त्यावर अ‍ॅडव्होकेट जनरल सुनील मनोहर म्हणाले, ‘राज्य सरकार त्यावरही विचार करत आहे. गोवंश हत्याबंदी ही फक्त सुरुवात आहे. इतर प्राण्यांच्या कत्तलीवरही बंदी घालण्याचा विचार आम्ही करू शकतो. सध्या गायी, बैलांचे संरक्षण करणे आवश्यक आहे, असे राज्य सरकारला वाटते.’