आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Did Not They Build Ram Temple When They In Power Mp Sanjay Raut

सत्तेत असताना राम मंदिर का उभारले नाही? - संजय राऊत यांचा सवाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - केंद्रात रालोआचे सरकार असताना राम मंदिर का उभारले गेले नाही? असा प्रश्न शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी मित्रपक्ष भाजपला विचारला आहे. तसेच त्यांना उशिरा का होईना, पण राम मंदिर आठवले, असा टोलाही त्यांनी लगावला.


भाजपाचे राष्‍ट्री य अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी ‘मंदिर वही बनायेंगे’चा दिलेला नारा व सरसंघचालक मोहन भागवत यांनीही नुकतेच राम मंदिराची उभारणी करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, अयोध्येत राम मंदिराची उभारणी हा शिवसेनेसाठी राजकारणाचा विषय नसून राष्ट्रीय अस्मितेचा विषय आहे. हाच नारा देऊन रालोआने एकदा सत्ता हाती घेतली होती. आता तरी मंदिराच्या उभारणीसाठी वचनबद्ध होण्याची गरज आहे.

...तर हिंदू माफ करणार नाहीत
अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशीद पाडल्यानंतर बाकी सर्व मंडळी जबाबदारीपासून कोसो दूर पळाली, तेव्हा एकट्या शिवसेनाप्रमुखांनी त्या घटनेची जबाबदारी स्वीकारली होती. केवळ निवडणुकांपुरता आपण हा मुद्दा आणत असू आणि नंतर पुन्हा त्या विषयाला अडगळीत टाकणार असू तर देशातील हिंदू आपल्याला माफ करतील का? असा प्रश्नही खासदार राऊत यांनी उपस्थित केला.