आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान, शायनी यांच्या याचिकांना प्राधान्य का? याचिकेतून हायकोर्टाला सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई हायकोर्टात दाखल याचिकेत हायकोर्टावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आले आहे. याचिकेत म्हटले आहे की, शिक्षेला आव्हान देणारे अभिनेते शायनी अहुजा, सलमान खान यांच्या अपीलांवर चौकटीबाहेर जाऊन सुनावणी केली जात अाहे. या उलट कैदेतील अनेक दोषींना न्यायासाठी वाट पाहावी लागत आहे.

शशिकला भगवान गांगुर्डे यांनी कैदेतील पती इतर दोषींच्या वतीने दाखल याचिकेवर न्यायमूर्ती रणजीत मोरे २० जुलैला सुनावणी करतील. सेलेब्रिटींची प्रकरणे सुनावणीसाठी बोर्डावर घेण्यात भेदभाव होत असल्याचा आरोप याचिकेत आहे.

6 वर्षे न्याय नाहीच
शशिकलांच्यापतीला २००९ मध्ये हत्येप्रकरणी दोषी ठरवले होते. त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. अपील अंतिम सुनावणीसाठी तयार ठेवा, असे आदेश हायकोर्टाने निबंधकांना ऑक्टोबर २००९ मध्ये दिले होते. मात्र, अद्याप प्रकरणावर सुनावणी झालेली नाही.
बातम्या आणखी आहेत...