Home »Maharashtra »Mumbai» Why Nitesh Rane Gives Such A Statement Like On Babasaheb Purandare?

'काँग्रेस विचारेना अन् भाजप बोलवेना', नीतेश राणेंच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय?

दिव्यमराठी वेब टीम | Sep 13, 2017, 12:29 PM IST

  • नीतेश राणेंनी पुरंदरेंबाबत वक्तव्य केल्याने राणे पिता-पुत्र स्वत:चा मार्ग आणखीणच कठीण करत चालल्याचे बोलले जात आहे.
मुंबई- नारायण राणेंचे आमदार सुपुत्र नीतेश राणे यांनी इतिहासतज्ज्ञ बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर केलेल्या अभोयनीय वक्तव्याबाबत सर्वत्र टीकेचा सूर उमटत आहे. 96 वर्षाच्या वयोवृद्ध बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या व्यक्तीला एखादा तरूण आमदार राज्यात एकटे फिरूनच दाखवावे अशी धमकी देऊन काय साध्य करू पाहत आहे असा टीकेचा सूर आहे. दरम्यान, नीतेश राणेंचा पुरंदरे यांच्याबाबतचा हा सूर नैराश्यातूनच आल्याचे मानले जात आहे. एकीकडे, भाजपमध्ये जाणार अशा वावड्या मागील अनेक महिन्यांपासून उठत असल्याने काँग्रेसमध्ये आता राणे पिता-पुत्रांना कोणीही विचारत नाही. तर दुसरीकडे, भाजपातील राणेंच्या प्रवेशाबाबत नेमके काहीही सांगता येत नाही. त्यामुळे अस्तित्त्वहिन होत चाललेल्या राणे पुत्राचा मध्येच पुरंदरेंबाबत वाचाळ वक्तव्य करून मराठा समाजात पुन्हा एकदा आपले स्थान निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
काँग्रेसचे आमदार असलेले नीतेश राणे यांनी आपल्या स्वाभिमानी संघटनेच्या वतीने दोन दिवसापूर्वी औरंगाबाद येथे मराठा परिषद आयोजित केली होती. त्यावेळी परिषदेला हजर असलेल्या मराठा समाजातील युवकांना खूष करण्यासाठीच हे वक्तव्य केल्याचे उघड आहे. पण बाबासाहेबांना पुरंदरेंबाबत आता वक्तव्य करण्यामागे मागील काही महिन्यांतील घडामोडी कारणीभूत आहेत.
काँग्रेसमध्ये मानाचे पान मिळत नसल्याने व त्या पक्षाला फारसे भविष्य उरले नसल्याने नारायण राणे अस्वस्थ होते. त्यातच त्यांच्यामागे भाजपने ईडीचे प्रकरण सोडले. काळाची पावले ओळखत राणेंनी भाजपला शरण जाण्याचे ठरवले. त्याआधी त्यांनी शिवसेनेत प्रवेशाबाबत चाचपणी केल्याचे बोलले गेले. मात्र, सेनेतील दुस-या फळीतील नेत्यांनी त्यास विरोध करताच उद्धव ठाकरे शांत झाले. त्यानंतर राणेंनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय पक्का केला. भाजपाने त्यांचा अंदाज घेतला. राणे प्रवेश करण्यास तयार आहेत मात्र त्यांच्या काही मागण्या आहेत व दोन्ही मुलांना लोकसभा व विधानसभेत तिकीटे हवी आहेत. या दरम्यान, अमित शहांनी राणेंच्या प्रवेशांचे गणित मांडले. त्यावेळी गडकरी, दानवे, चंद्रकांतदादा पाटील, आशिष शेलार आदी मंडळींनी राणेंना हिरवा कंदिल दाखवला.
मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोध केला. राणेंचा भाजपला कितपत आणि कुठे फायदा होईल तसेच त्यामुळे शिवसेनेसोबतचे संबंध कसे राहतील याची धास्ती फडणवीसांना होती. राणेंना आता घाईने प्रवेश देण्याची काहीच गरज नाही. त्यांना पक्षात घेतल्याने फायद्यापेक्षा तोटाच जास्त असल्याचे फडणवीसांनी मोदी-शहांच्या कानी घातले. त्यामुळे राणेंचा भाजप प्रवेशही मध्येच लटकला आहे. त्यामुळे राणेंसह त्यांचे दोन्ही पिता-पुत्रा अस्वस्थ आहेत.
पुढे स्लाई़डद्वारे वाचा, नीतेश राणेंच्या या वक्तव्यानंतर भाजप-शिवसेनेने काय दिली प्रतिक्रिया...
नारायण राणेंवर वाईट दिवस मुलांमुळेच- कोण म्हणाले असे...

Next Article

Recommended