मुंबई - धार्मिक महोत्सवांदरम्यान ध्वनिप्रदूषण करणा-यांवर कोणत्याच प्रकारची कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला आहे. अशा महाेत्सवांदरम्यान ध्वनिप्रदूषण करणा-या आयोजकांना कोणत्या धर्तीवर पुन्हा परवाने देण्यात आले हेसुद्धा राज्यसरकारने स्पष्ट करावे, असे न्यायमूर्ती अभय ओका आणि ए.एस.गडकरी यांच्या पीठाने विचारले. डॉ.महेश बेडकर यांनी यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्वाळा दिला.