आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Not Till Date Ganesh Pande Arrested? Opposition Asks Question In Assembly

गणेश पांडेला राज्य सरकार पाठीशी घालतयं, अद्याप अटक का नाही?- जयंत पाटील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गणेश पांडेला फडणवीस सरकार वाचवत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. - Divya Marathi
गणेश पांडेला फडणवीस सरकार वाचवत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
मुंबई- मुंबईतील भाजप युवा कार्यकर्ती मैथिली जावकर यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्याय देणार आहेत काय? असा सवाल करीत राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी आज गणेश पांडेच्या अटकेबाबत प्रश्न उपस्थित केले.
वर्सोवा पोलिस ठाण्यात मैथिली जावकर यांनी तक्रार दाखल केल्यानंतरही गणेश पांडेला अटक का होत नाही, असा सवाल विधानसभेत उपस्थित केला. तसेच राज्य सरकार गणेश पांडेला पाठीशी घालत असून मैथिली जावकर यांना फेसबुक, व्हाट्सअॅप या माध्यमांतून धमकावले जात आहे व त्यामुळेच त्यांनी पोलिसांकडे प्रोटेक्शनची मागणी केली आहे, मात्र त्यांना अजूनही ते दिले गेलेले नाही, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
जयंत पाटील पुढे म्हणाले, गणेश पांडे हा अंडरवर्ल्डशी संबंधित आहे. गुटखा व्यवसायाशीही त्याचा संबध आहे. त्यामुळे पीडित महिला भयभीत आहे. वर्सोवा पोलिस कोणतीही कारवाई करत नाहीत, म्हणून दाद मागावी तर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी भाजपच्या नेत्या आहेत. त्यामुळे पीडित महिलेला न्याय मिळण्याच्या शक्यतेबाबत प्रश्नचिन्हच दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही पांडेला अद्याप अटक झालेली नाही. तो राजरोस मोकळा फिरत आहे. त्यामुळे सभागृह अध्यक्षांनी सरकारला समज द्यावी अशी मागणी जयंत पाटील यांनी विधानसभेत केली. त्यावर ‘या प्रकरणी सरकारने दिलेले आश्वासन पाळावे’असा निर्देश विधानसभा अध्यक्षांनी सरकारला दिला.
पानसरे हत्येतील आरोपींना सरकार वाचवतेय- धनंजय मुंडे
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला वर्ष उलटूनही मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाही, हत्येच्या तपासात जाणीवपूर्वक विलंब होत असून अटक केलेला एकमेव आरोपी समीर गायकवाडला वाचवण्याचा शासनाकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप विधान
परिषदेचे विरोधी पक्षनते धनजंय मुंडे यांनी केला.
कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येच्या तपासात प्रगती होत नसल्याबद्दल न्यायालयाने व्यक्त केलेली नाराजी व ओढलेल्या ताशेऱ्यांचा मुद्दा मुंडे यांनी 289 अन्वये सभागृहात उपस्थित केला होता. यावेळी पोलिसांकडून आरोपी समीर गायकवाडची चौकशी योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप मुंडे यांनी केला. न्यायालयाकडून वेळ वाढवून मागूनही तपासात प्रगती झालेली नाही. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात टाळाटाळ होत आहे. चौकशीविनाच आरोपपत्र दाखल करण्याची घाई सुरु आहे. यामुळे सरकार आरोपी गायकवाडला पाठीशी घालत आहे, अशी लोकभावना झाली असून त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही मुंडे यांनी दिला.