आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Why Should After 63 Years Women Not Retired ? High Court Ask Question To Labour Commissioner

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिलांना 63 नंतर निवृत्ती का नाही ? कामगार आयुक्तांना उच्च न्यायालयाचा सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पोद्दार मिलमध्ये काम करणा-या महिलांना पुरुष कामगारांप्रमाणे 63 व्या वर्षी निवृत्ती का देता येत नाही, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने कामगार आयुक्तांना केली आहे. न्यायमूर्ती मोहित शहा आणि अनुप मोहटा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. शासनाच्या 20- ए या सुधारित अध्यादेशानुसार पुरुष आणि महिला कामगारांच्या फिजिकल फिटनेसचे निकष सारखेच आहेत. त्यामुळे नियम 14 आणि 16 नुसार महिलांनाही 63 व्या वर्षी निवृत्त करण्यात यावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

याबाबत कामगार आयुक्त कार्यालयाने दोन महिन्यांच्या आत आपले म्हणणे मांडण्याची सूचनाही न्यायालयाने केली आहे. पोद्दार मिलमध्ये काम करणा-या दोन महिला कामगारांना 60 वर्षे झाल्यानंतर निवृत्त होण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी मिलच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.