आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
मुंबई - भारताविरोधात चिथावणीखोर भाषणे केल्याचा आरोप असूनही वसीम रहमान या पाकिस्तानी नागरिकाचा व्हिसा वर्षभराने का वाढवण्यात आला? असा सवाल उपस्थित करत उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली. यासंदर्भातील स्पष्टीकरण दोन आठवड्यांत सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
भांडुप येथील हजरत ख्वाजा मन्सूर हसन या दर्ग्याच्या मूळ मालकाने दर्ग्याची जागा वसीम रहमान या आपल्या नातवाच्या नावे केली आहे. रहमान हा पाकिस्तानचा रहिवासी आहे. 2006 पासून भारतात येणा-या रहमानवर प्रक्षोभक व धार्मिक तेढ पसरवणारी भाषणे करण्याचा गुन्हा नोंद आहे. तसेच, दर्ग्याच्या विश्वस्त मंडळींनाही जागेच्या मालकीवरून धमकावण्याचा गुन्हा त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. त्याच्या धमक्यांना कंटाळून या दर्ग्याच्या विश्वस्त मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
बेकायदा बांधकामही
रहमानच्या व्हिसाची मुदत 10 डिसेंबर रोजी संपली होती. त्याच्याविरोधातील तपास अद्याप अपूर्ण असल्यामुळे त्याचा व्हिसा 45 दिवसांनी वाढवण्यात यावा, अशी पोलिसांतर्फे केंद्राला विनंती करण्यात आली होती, पण केंद्राने ही मुदत वर्षभरानेच वाढवली. रहमानने दर्गा परिसरात अनधिकृत बांधकामे उभारल्याचा आरोप आहे. या बांधकामांविरोधातील कारवाईची माहिती देण्याचे आदेशही न्यायालयाने महापालिकेला दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.