आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Should Sharad Pawar Keep Mum? Udhav Thakare\'s Question

आता शरद पवार गप्प का; उद्धव ठाकरेंचा सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दुष्‍‍काळासह दुष्काळग्रस्तांबाबत केलेल्या अर्वाच्य भाषेत थट्टा केली. त्यामुळे विरोधक त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून विरोधकांनी विधिमंडळाचेही कामकाज व्यवस्थित होऊ दिले नाही. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि अजित पवार यांचे काका शरद पवार आता गप्प का बसले आहेत, असा सवाल शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.


'रानवाट' या संकेतस्थळाच्या उद्घाटनाप्रसंगी उद्धव ठाकरे बोलत होते. बाळासाहेब ठाकरेंनी पंतप्रधानपदासाठी सुषमा स्वराज यांना आशीर्वाद दिला होता. त्यावेळी मोदींचे नाव चर्चेत नव्हते .एनडीएने लवकर आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवावा, असेही ठाकरे यांनी सांगितले. शिवसेना पंतप्रधानपदासाठी मोदींना पाठिंबा देण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.