आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा मुस्लिम योद्धा बनला होता 17 व्या वर्षीच राजा, घालायचा \'राम\' अंगठी, वाचा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टिपू सुलतान यांची 41 ग्रॅम वजनाची सोन्याची व त्यावर 'राम' असे अक्षर लिहलेली अंगठी... - Divya Marathi
टिपू सुलतान यांची 41 ग्रॅम वजनाची सोन्याची व त्यावर 'राम' असे अक्षर लिहलेली अंगठी...
अठराव्या शतकातील म्हैसूरचे राजे टिपू सुलतान यांची आज 217 पुण्यतिथी आहे. 20 नोव्हेंबर 1750 रोजी जन्माला आलेला हा म्हैसूरचा राजा 4 मे 1799 रोजी अनंतात निघून गेला. केवळ 50 वर्षाचे आयुष्य जगलेला या मुस्लिम राजाने वयाच्या 17 व्या वर्षीच म्हैसुरचे राज्य ताब्यात घेतले होते. म्हणूनच टिपू सुलतानला 'टायगर ऑफ म्हैसूर' असे म्हटले जाते. टिपू सुलतान हा हिंदूविरोधी होता व अनेक हिंदू लोकांना मारले किंवा त्यांचे धर्मांतर केले असा समज आहे. मात्र, तो तितकासा खरा नाही. उलट त्याच्यातील युद्धकौशल्यामुळे त्याला मिळालेल्या क्षेत्रीय किंवा राष्ट्रीय यशाकडे लोक डोळेझाक करतात असे इतिहासतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मराठा साम्राज्याचे महामेरू शिवाजी महाराजांनी जसा राज्य कारभार केला तसाच कर्नाटक व म्हैसूर पट्ट्यात टिपू सुलतान यांनी राज्य केल्याचे काहीजण सांगतात. टिपूची आणखी एक खास ओळख म्हणजो तो मुस्लिम राजा असला तरी हिंदू धर्मात ज्यांना देवता मानले जाते त्या रामाच्या नावाची अंगठी हा राजा घालायचा. अलीकडे झालेल्या इतिहास संशोधनातून काढलेल्या अनेक निष्कर्षांतून इतिहासतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, शिवाजी महाराजांप्रमाणेच टिपू सुलतान हा सेक्युलर राजा होता. 217 व्या पुण्यतिथीनिमित्त आज आपण म्हैसूरच्या राजाविषयी माहिती घेऊया...
टिपू सुलतान मराठ्यांसारखाच योद्धा-
मराठ्यांप्रमाणे टिपू सुलतान हा योद्धा होता. मराठ्यांचे सैन्य पानिपत युद्धात पराभूत झाले व नंतर मराठेशाही कोसळली. ते सारे पाहता टिपू सुलतानाने दिलेला लढा हा तुलनेने अधिकच मोठा वाटतो. या साऱ्या गोष्टी 40 वर्षांच्या आत घडल्या. म्हणजे 1761 मध्ये जेव्हा मोहंमद अब्दालीने पानिपत जिंकले तेथपासून 1799 मध्ये टिपूचा मृत्यू होईपर्यंतच्या घटना हेच सांगतात. या मोजक्या वर्षांत इंग्रजांनी आपल्या शत्रूंना संपवले, पण टिपू आणि पंजाब यांना ते पराभूत करू शकले नाहीत. पंजाब मात्र रणजितसिंगच्या मृत्यूनंतर काही दशकांत आपोआप शरण गेला. टिपूनेच काय तो त्यांच्याशी प्रबळ लढा दिला. त्याला भूगोल, इतिहासाची उत्तम जाण होती. त्याआधारे राजकारणात टाकले जाणारे डावपेच त्याला अचूक माहिती असत. याला जिओपॉलिटिक्स म्हणतात. फ्रेंचांना तो ब्रिटिशांविरुद्ध खेळवू शकायचा. त्याचा लढाईबद्दलचा दृष्टिकोन आधुनिक होता, त्यांच्याकडे युद्धकौशल्य जबरदस्त होते. केवळ तो मुस्लिम राजा होता म्हणून त्याच्या यशाकडे लोक डोळेझाक केल्याचे म्हणता येईल.
भारतात अशोकाला मान मग टिपूला का नाही? वाचा पुढे...
बातम्या आणखी आहेत...