आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापुरात महिलेने केला प्रियकराच्या मदतीने पतीचा खून; मृतदेह फेकला आंबोली घाटात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/कोल्हापूर- गडहिंग्लजमधील शिक्षक विजयकुमार गुरव यांच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे. विजयकुमार यांच्या पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने त्यांचा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

 

खूनप्रकरणी विजयकुमार यांची पत्नी जयलक्ष्मी गुरव आणि तिचा प्रियकर सुरेश चोथे या दोघांना मुंबईतील लोअर परळमधून अटक करण्यात आली आहे. 11 नोव्हेंबरला सिंधुदुर्गच्या आंबोली कावळेसाद येथे छिन्नविछीन्न अवस्थेत एक मृतदेह आढळून आला होता. त्याचवेळी गडहिंग्लज येथून आपले शिक्षक पती बेपत्ता झाल्याची तक्रार जयलक्ष्मी गुरव या महिलेने दिली होती.

 

गुरव यांच्या हातातील दोऱ्यावरुन मृतदेहाची ओळख त्यांच्या मुलाने पटवली होती.

पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर अनैतिक संबंधातून पत्नीनेच हा खून केल्याचे समोर आले होते. न्यायालयात हजर केल्यानंतर दोघांना आठ दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...