आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wife & Her Lover Murdered His Hasbund In Ullhasnagar

अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या पतीची हत्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर परिसरात उघडकीस आली आहे. पतीची हत्या करून मृतदेह झाडाझुडपात फेकून दिला. मात्र, पोलिसांच्या चाणाक्षपणामुळे पत्नीचे बिंग फुटले व तिच्यासह तिच्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
याबाबतची माहिती अशी की, उल्हासनगरजवळील नेवाळी भागातील आकृती चाळ येथे संजय हाजरा (32) आणि पत्नी अनुबा (23) हे बंगाली दांम्पत्य आपल्या 3 वर्षीय मुलीसमवेत राहत होते. संजय हाजरा सोन्याचे दागिने बनविण्याचे काम करत होता. दरम्यान, त्याची पत्नी अनुबा आणि दिपंकर पात्रा (32) यांच्यात गेल्या तीन वर्षापासून अनैतिक संबंध होते. त्याची कुणकुण पती संजयला लागली होती. त्यामुळे संजय व अनुबा यांच्यात वरचेवर खडके उडू लागले. संजय अनुबावर लक्ष ठेऊ लागला. त्यामुळे यांच्या संबंधत अडथळे येऊ लागले.
अखेर पत्नी अनुबा व प्रियकर दिपंकर यांनी संजयला संपविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी रात्री दिपंकर संजयच्या घरी पोहचला. त्यावेळी संजय झोपला होता. दिपंकरने अनुबाच्या मदतीने धारधार शस्त्राने संजयची लागलीच हत्या केली. तसेच रात्रीच नेवाळी परिसरात झाडाझुडपात संजयचा मृतदेह फेकून दिला. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास संजयचा मृतदेह परिसरातील नागिरकांना आढळून आला. अखेर पोलिस अनुबापर्यंत पोहचले. मात्र, पती रात्री घराबाहेर पडला तो परत आलाच नाही असे सांगू लागली. त्याचवेळी शेजारील नागरिकांकडून अनुबाचे दिपंकर नावाच्या तरूणाशी संबंध आहेत याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावेळी चौकशी केली असता अनुबा व दिपंकर दोघेही पोलिसांची दिशाभूल करायला लागले.
अखेर पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने अनुबाचे निरीक्षण केले व ती जाळ्यात सापडली. तिने दिपंकरच्या मदतीने हत्या केल्याची कबुली दिली. दिपंकरलाही पोलिसी खाक्या दाखवताच अनैतिक संबंधात अडसर ठरू लागल्याने संजयचा काटा काढल्याची कबुली त्याने दिली. एक क्राईम सिरियल पाहून संजयचा हत्येचा प्लॅन आखला असे या दोघांनी सांगितले. अनुबा व दिपंकर यांना पोलिसांनी अटक केली असून, 30 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.