आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमीन घेण्यासाठी पत्नीला विकले, तेही आपल्याच भावाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गावाकडे जमीन खरेदी करण्यासाठी एकाने पत्नीला, सख्ख्या भावाला काही हजार रुपयांत विकल्याची घटना नालासोपारा येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या दिराला पोलिसांनी अटक केली आहे.
बाबू सोनी असे आरोपीचे नाव असून त्याने आपला भाऊ राजूकडून त्याच्या पत्नीची काही हजारांत खरेदी केली. सहा महिन्यांपूर्वीच राजूचे एका 19 वर्षीय तरुणीसोबत लग्न झाले होते. राजूला त्याच्या मूळ गावात जमीन खरेदी करायची होती. मात्र, त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे तो नालासोपा-यातील आपल्या भावाकडे गेला होता. त्या वेळी बाबूने पैशांच्या मोबदल्यात त्याच्याकडे पत्नीची मागणी केली. त्यावर राजूनेही होकार देत पैसे घेऊन पत्नीला बाबूकडे सोपवले. त्यानंतर तो गावाकडे गेला.
बाबूने 20 ऑक्टोबर रोजी महिलेवर पहिल्यांदा बलात्कार केला. त्यानंतर त्याने पीडितेवर अनेकदा अत्याचार केले. दोन दिवसांपूर्वी तिने बाबूच्या तावडीतून सुटका करून घेत पोलिस ठाणे गाठले. तिने तक्रार दिल्यानंतर बाबूला अटक करण्यात आली.