आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wight Holiday Resort Paid Customer 10 Thousand Rupees High Court

हॉलिडे रिसॉर्टला ग्राहक न्यायालयाचा दणका; भरपाई देण्याचे आदेश

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: हॉलिडे स्कीममध्ये गुंतवणूक केलेले पैसे परत देण्यास टाळाटाळ करणार्‍या कंपनीला ग्राहक न्यायालयाने चांगलीच अद्दल घडवली. कंपनीच्या या कृत्यामुळे ग्राहकाला झालेल्या मनस्तापापोटी 10 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने वाईट हॉलिडे रिसॉर्टला दिले. विलेपार्ले येथील पी. रत्नाकर यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती.
रत्नाकर यांनी या रिसॉर्टच्या एका योजनेत पैसे गुंतवले होते. पाच वर्षांसाठी 36 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर प्रत्येक वर्षी गुंतवणूकदाराला या रिसॉर्टमध्ये आठवडाभर राहायला मिळणार होते. तसेच पाच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर गुंतवणूकदाराला तिची रक्कम परत मिळणार होती. 2000 मध्ये रत्नाकर यांनी ही रक्कम ब्राइट हॉलिडेमध्ये गुंतवली.
पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपले पैसे परत मागितले असता कंपनीने ते देण्याऐवजी त्यांच्यासोबतचा करार आणखी एका वर्षासाठी वाढवला.हॉलिडेमध्ये राहण्याचीही मुभा दिली. परंतु पैसे परत हवे असलेल्या रत्नाकर यांनी कंपनीची ऑफर धुडकावून लावली. यासंदर्भात त्यांनी वारंवार स्मरणपत्रे पाठवूनही कंपनीने दाद दिली नाही. त्यामुळे रत्नाकर यांनी ग्राहक न्यायालयाचे दरवाजे ठोठावत 20 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.