आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wikileaks News In Marathi, Narendra Modi, Priti Gandhi, Divya Marathi

मोदींसंदर्भातील वि‍किल‍िक्सचे केबल खरे - प्रीती गांधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी भ्रष्ट नसल्याने अमेरिका त्यांना घाबरत असल्याची एक केबल दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये फिरत आहे. या केबलमुळे मोदी यांची प्रतिमा उजळत असल्याने भाजपनेही ही केबल तयार केल्याचे म्हटले जात असून प्रीती गांधी यांचे नाव त्यासाठी घेतले जात आहे. परंतु प्रीती गांधींनी या गोष्टीचा इन्कार केला आहे. प्रीती गांधी या महाराष्ट्र भाजपच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संयुक्त निमंत्रक आहेत.


अमेरिकन वकिलातीमधील राजनैतिक अधिकारी मायकेल ओव्हेन यांची सन 2006 मधील केबल गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये फिरत आहे. मोदींच्या राज्यात गुजरातचा विकास झाला असून मुस्लिमही सुरक्षित आहेत. अमेरिकेतही मानवी हक्क कायद्याचे उल्लंघन झाल्याचेही या केबलमध्ये म्हटले आहे. गुजरातमधील काँग्रेस नेते माजी मंत्री दिग्विजय सिंह यांच्याशी झालेले संभाषणही केबलमध्ये आहे. मोदी राष्ट्रीय नेते बनू शकतात आणि ते स्वत: भ्रष्ट नसल्याने भाजपमधील भ्रष्टाचारही मोडीत काढू शकतात, असे म्हटल्याचा उल्लेख आहे. ही केबल प्रसिद्ध झाल्यानंतर विकिलिक्सने या केबल खोट्या असल्याचा दावा एक केबल पाठवून केला आहे. यामागे भाजपचा आयटी सेल असून हा प्रकार प्रीती गांधी यांनी केल्याचेही म्हटले जात आहे. याबाबत प्रीती यांनी सांगितले, माझ्याकडे ट्विटरवर एक पोस्ट आली ती मी रिट्विट केली. ही पोस्ट कोणी पाठवली हे मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण हजारोंनी ही पोस्ट पाठवलेली आहे. त्यामुळे नक्की कुठून पोस्ट आली ते सांगता येणे अवघड आहे. या केबलचा आम्हाला फायदा होत असून काँग्रेस मुद्दाम याचे राजकारण करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला. त्यांनी आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ विकिलिक्सच्या मूळ केबलची लिंकही ‘दिव्य मराठी’कडे पाठवली आहे.


या केबलमध्ये नरेंद्र मोदी यांच्याशी भेटीची चर्चा असून मोदींची प्रशंसा केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. एकूणच नरेंद्र मोदी यांचे नाव चर्चेत कसे राहील याची काळजी भाजपचा आयटी विभाग कसा घेत आहे याचे प्रत्यंतरच येत आहे.