आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Will Get Less Prices Homes In Mumbai News In Marathi

मुंबईत स्वस्त घरांची ‘लाॅटरी’ लागणार, ‘एफएसआय’मध्ये आठपटींनी वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जगातील आठव्या क्रमांकाचे अाणि देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर असलेल्या मुंबईतील घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. त्याला पायबंद घालण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने नव्या विकास आराखड्यात इमारतींना आठपट चटईक्षेत्र निर्देशांक देण्याचा ऐतिहासिक िनर्णय घेतला अाहे. त्यामुळे या मायानगरीतील घरांच्या किमती कमी होणार आहेत.
४३७ चौ. कि.मी. क्षेत्र असलेल्या मुंबईची लोकसंख्या १ कोटी २४ लाख अाहे. लोकसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी आजपर्यंत चटईक्षेत्र निर्दशांक (एफएसआय) वाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे िवकास हक्काचा तुटवडा निर्माण झाला. घरांची उपलब्धता कमी झाली आणि घरांच्या किमती गगनाला भिडल्या अाहेत. चइर्टक्षेत्र वाढवून देण्याची बांधकाम क्षेत्राची गेली अनेक वर्षे मागणी होती. त्याला आता यश आले असून २०१४-३४ या िवकास आराखड्यात अडीच ते आठपर्यंत चटईक्षेत्र मिळणार आहे. पूर्वीच्या िनयंत्रित चटईक्षेत्राच्या जागी आता लवचिक चटईक्षेत्र जाहीर झाल्याने मंबईतील िबल्डर लाॅबी अाणि मध्यमवर्गीयांत आनंद व्यक्त होत आहे. मुंबईच्या या तिसऱ्या िवकास आराखड्यात समूह िवकासाला १० चटई क्षेत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक वर्षे रखडलेले चाळी आणि झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे. मोठ्या िनवासी प्रकल्पांना १० टक्के मोकळी जागा सोडावी लागणार आहे. त्यामुळे शहरातील खुली जागा दुप्पट होणार आहे. घरांच्या िकमती गगनाला िभडल्याने मुंबईतील मध्यवर्गीयांचे हक्काच्या घराचे स्वप्न आवाक्याबाहेर गेले होते. त्यामुळे हा मध्यवमर्ग म्हाडा अाणि सिडको यांच्या घरांच्या लाॅटरीकडे डोळे लावून बसत होता. या चाकरमान्यास आता खासगी िवकासकांच्या प्रकल्पांचा पर्याय राहील.

मुंबईतील विकास आराखड्यांचे टप्पे
1. लोकसहभागातून िवकास आराखडा बनवणारे मुंबई देशातील पहिले शहर आहे.
2. पहिला िवकास आराखडा १९६७ मध्ये, तर दुसरा १९९१ मध्ये तयार करण्यात आला होता.
3. तिसऱ्या िवकास आराखड्यास पालिकेने मंजुरी िदल्यानंतर तो नागरिकांच्या हरकतीसाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर राज्य सरकारच्या मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी होईल.