आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्र न्यायाधिशांसमोर सलमान खान शरण, 10 मिनिटांत जामीन मिळवून परतला घरी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव्याने जामीन घेण्यासाठी कोर्टात निघालेला सलमान खान. - Divya Marathi
नव्याने जामीन घेण्यासाठी कोर्टात निघालेला सलमान खान.
मुंबई - हिट अँड रन प्रकरणात सलमान खानला सेशन कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. यानंतर सलमान खानने सेशन्स कोर्टात जामीन मिळविण्यासाठी 30 हजार रूपयांचा बाँड भरला. तसेच सेशन्स कोर्टाच्या न्यायाधिशांच्यासमोर शरण आला. न्यायाधिश जे डब्ल्यू देशपांडे यांच्याकडे पाहून त्याने स्मितहास्य केले. त्यानंतर केवळ 10 मिनिटांतच तांत्रिक बाबी पूर्ण करून सलमान कोर्टाच्या बाहेर आला. तेथे चाहत्यांनी त्याच्या नावाचा एकच जल्लोष केला. सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी तो आपल्या वांद्रेकडील घराकडे रवाना झाला. अखेर मागील तीन दिवसापासून सुरु असलेल्या सलमान खानच्या हिट अँड रन नाट्य प्रकरणावर पुढील महिनाभरासाठी ( 15 जूनपर्यंत) पडदा पडला.
हाईकोर्टाचा निर्णय असा...
- सेशन्स कोर्टाने दिलेल्या पाच वर्षांच्या शिक्षेवर लगेचच अंमलबजावणी नाही.
- सलमान खान जामिनावर बाहेर राहणार. तो सेशन कोर्टात जाऊन 30 हजार रुपयांचा बेल बाँड नव्याने भरून जामिनाची प्रक्रिया पूर्ण करणार.
- प्रकरणाची पुढची सुनावणी 15 जून रोजी होणार.
- परदेशात जाण्यासाठी सलमानला कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल.

निर्णयाचा अर्थ
- 15 जून पर्यंत सलमानला तुरुंगात जावे लागणार नाही.
- 15 जूनला सुनावणीदरम्यान जर हायकोर्टाने जामीन रद्द केला तर तुरुंगात जावे लागेल.
- दरम्यान, सलमानला त्याच्या चित्रपटांचे उर्वरित शुटिंग पूर्ण करता येईल.

UPDATES
2.00 PM सलमान खान सेशन कोर्टात पोहोचला.
--------------
1:40 PM: बेल बाँड भरण्यासाठी सेशन कोर्टात जाणाऱ्या सलमानच्या गाडीच्या मागे माध्यमांची गर्दी. थोड्याच वेळात कोर्टात पोहोचणार.
--------------
1:25 PM: सलमान खान सेशन कोर्टात नव्याने बेल बाँड भरण्यासाठी रवाना
--------------
12:57 PM: अभिनेता अजय देवगन सलमानची भेट घेण्यासाठी घराबाहेर पडला. शाहरूखच्या घराबाहेरही सुरू आहे जल्लोष.
--------------
12:45 PM: सलमानच्या घराबाहेर चाहत्यांचा जल्लोष.
--------------
12:40 PM: हाईकोर्टात पुढील सुनावणी 7 जूननंतर.
12:33 PM: हायकोर्टाने सलमानच्या शिक्षेला स्थगिती दिली, सेशन कोर्टात सरेंडर करून नव्याने जामीन घेण्याचे निर्देश दिले.
--------------
12:25 PM: आरोपीवर कलम 304-2 अपघात प्रकरणात लावले नव्हते. मग ते नंतर का लावले.
--------------
12:20 PM: न्यायाधीश म्हणाले, हा निकाल नाही, पण माझ्या मते जर न्यायालयात सुनावणी सुरू असेल तर तुरुंगात कशा साठी पाठवायचे ? यावर सरकारी पक्षाने बाजू मांडण्यास सांगितले.
--------------
12:16 PM: सरकारी वकिलांचा युक्तिवाद, न्यायाधीश म्हणाले अधिका-याची चौकशी करणार.
--------------
12:15 PM: सरकारी वकिलांचा युक्तिवाद, कारमध्ये घटनेच्या वेळी केवळ तीन जण होते. सरकारी वकील म्हणाले, सलमान खान प्यायला होता दारु.
--------------
12:10 PM: न्यायाधीशांनी सलमानच्या वकिलांना विचारले, कोर्टची दिशाभूल तर करत नाहीत ना?
--------------
12:08 PM: न्यायाधिशांनी विचारले, शिक्षा स्थगित करण्यास विरोध कशासाठी? त्यामागचा आधार काय ?
--------------
12:06 PM: हायकोर्टाबाहेर सलमानच्या चाहत्याने केला आत्महत्येचा प्रयत्न.
--------------
12:05 PM: सरकारी वकील म्हणाले की, कमाल खान ब्रिटिश नागरिक आहे. त्यामुळे त्याची चौकशी करता आली नाही.
--------------
11:59 AM: सरकारी पक्षाचा युक्तिवाद सुरू.
--------------
11:57 AM: सलमानचा वकील म्हणाला की, रवींद्र पाटीलला चौकशीत मार्ग का सांगता आला नाही?
--------------
11:50 AM: सलमानच्या वतीने हायकोर्टात सादर करण्यात आला साक्षीदार, वकील म्हणाले गाडीत चार लोक उपस्थित होते.
--------------
11:45 AM: सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे की, सलमान खानला जामीन द्यायला हवा.
--------------
11:40 AM: रवींद्र पाटीलच्या ग्वाहीबाबत उपस्थित केले प्रश्नचिन्ह. पाटीलने रूट बदलणे आणि टायर फुटल्याबाबत काहीही का सांगितले नाही. त्यालाच प्रमुक साक्षीदार का ठरवले?
--------------
11:38 AM: सलमानचे वकील म्हणाले, घटनेच्या वेळी सलमानच्या कारमध्ये रवींद्र पाटील आणि कमाल खानही होता. मग त्याची साक्ष का घेण्यात आली नाही. त्याची चौकसी का केली नाही?
--------------
11:37 AM: सलमानचे वकील अमित देसाई यांनी सेशन कोर्टाच्या निर्णयात चूक झाल्याचे म्हटले. कारमध्ये किती लोक होते यावर युक्तिवाद केला. तसेच सलमान गाडी चालवत होता हे सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश आल्याचे म्हटले.
--------------
11:35 AM: कोर्टात सलमानच्या वकिलांनी रवींद्र पाटीलला प्रमुख साक्षीदार बनवण्याबाबत प्रश्न उपस्थित केला.
--------------
11:24 AM: सलमानचे वकील अमित देसाई यांनी हायकोर्टात कमाल खानचा मुद्दा उचलला. देसाई म्हणाले, अपघाताच्या रात्री गाडीत गायक कमाल खान उपस्थित होता. मुंबई पोलिसांनी केवळ त्याचा जबाब घेतला. त्याची चौकशी केली नाही.
--------------
11:20 AM: सुनावणीला सुरुवात, न्यायाधीशांनी रवींद्र पाटीलच्या जबाबाची प्रत मागवली, त्याचा अभ्यास करणार
सलमानच्या वकिलांनी युक्तिवादात एक वगळता सर्व कलमं जामीनपात्रं असल्याचे सांगितले. त्यावर उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांनी दिवंगत साक्षीदार रवींद्र पाटील याच्या जबाबाची प्रत पाहण्याची मागणी केली. तसेच सलमानच्या शिक्षेला स्थगिती देण्यास विरोध का? त्यामागचा आधार काय? अशी विचारणा न्यायधीशांनी सरकार पक्षाला केली आहे. तसेच माझ्या कोर्टासमोर सुनावणी सुरू असताना, निकाल लागेपर्यंत त्याला तुरुंगात पाठवण्याची गरज काय असे निरीक्षणही न्यायाधीशांनी मांडले. हे निरीक्षण आहे निकाल नाही, असेही त्यावेळी न्यायाधीशांनी सांगितले.
सत्र न्यायालयाच्या निर्णयचा आधार काय असेही कोर्टाने विचारले. या जामीनासाठी दिग्गज वकिलांची फौज सलमानच्या कुटुंबीयांनी उभी केली आहे. दरम्यान सलमानच्या एका चाहत्याने कोर्टाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
कमाल खानच्या सक्षीचा मुद्दा
2002 साली ज्यावेळी ही घटना घडली होती, त्यावेळी गाडीमध्ये चौघे जण होते असा दावा सलमानच्या वकिलांनी केला आहे. या चौघांपैकी एक महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या कमाल खानची साक्ष अद्याप झाली नसल्याचे कोर्टाला सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर कमाल खान हा इग्लंडमध्ये स्थायिक झाला असून त्यानंतर तो परत आलेला नाही.
चाहत्याचा आत्महत्येचा प्रयत्न
दरम्यान, सलमान खानच्या एका चाहत्याने हायकोर्टाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. कोर्टात सुनावणी सुरू असताना कोर्टाबाहेर त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यांच्यापैकीच एका चाहत्याने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पोलिसांनी वेळीच त्याला अडवले असून त्याला आता लगेचच रुग्णालयाकडे नेण्यात आले आहे.
पाच वर्षांची शिक्षा झालेल्या सलमान खानच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाल्यानंतर तो तुरुंगात जाणार की जामीनावर सुटणार हे स्पष्ट होणार आहे. सलमान सध्या दोन दिवसांच्या अंतरिम जामीनावर आहे. मुबई सेशन कोर्टाने सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

रात्रभर भेटले सेलिब्रिटींची गर्दी
दोन दिवसांच्या अंतरिम जामीनावर असलेल्या सलमान खानला भेटण्यासाठी सेलिब्रिटींची रांग लागलेली आहे. गुरुवारीही सेलिब्रिटी रात्रभर सलमानला भेटण्यासाठी येत होते. शिक्षा सुनावण्याच्या एका दिवसापूर्वीही सलमानला भेटण्यासाठी अशा प्रकारे सेलिब्रिटींगी गर्दी जाली होती. गुरुवारी रात्री सुनील शेट्ठी,ऋतिक रोशन अशा बड्या सेलिब्रिटींनी सलमानची त्याच्या वांद्रे येथील घरी भेट घेतली.
काय होऊ शकते?
बुधवारी ज्याप्रमाणे सलमानला शिक्षा सुनावताच हायकोर्टात जामीनासाठी अर्ज करण्यात आला त्याच प्रमाणे शुक्रवारीही तयारी असू शकते. सलमानच्या वतीने प्रसिद्ध वकील हरीश साळवे त्याची बाजू मांडतील. सलमान विरुद्ध सादर करण्यात आलेले पुरावे कशा प्रकारे पुरेसे नाहीत किंवा योग्य नाहीत हे सांगण्याचा प्रयत्न करून ते सलमानच्या शिक्षेच्या विरोधात युक्तिवाद करतील. त्याचप्रमाणे त्यानंतर त्याच्या जामीनासाठीही युक्तिवाद केला जाऊ शकतो. सलमान ज्या प्रमाणे अाता पर्यंत जामीनावर होता, त्याच प्रमाणे त्याला जामीन दिला जावा अशी मागणी सलमानचे वकील करू शकतात, असे कायदे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे याठिकाणी जामीन मंजूर न झाल्यास लगेचच सुप्रीम कोर्टात अर्ज करण्यासाठी प्रयत्न केला जाऊ शकतो, पण त्यासाठी सुनावणी किती वाजता होते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTO'S