आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Within Seven Minutes Police Come For Helping : Homeminister Patil\'s Intiative For Women Security

सात मिनिटांत मदतीला पोलिस : गृहमंत्री पाटील यांचा महिला सुरक्षेसाठी उपक्रम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस कटिबद्ध असून मुंबईतील महिलांनी 103 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास सात मिनिटांत त्यांच्या मदतीला पोलिस पोहोचतील असा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मंगळवारी दिली. मुंबई पोलिसांच्या वतीने विलेपार्ले येथील भाईदास हॉलमध्ये एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ गीतकार व खासदार जावेद अख्तर, पोलिस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर, अलेक पदमसी, शबाना आझमी, राणी मुखर्जी, करिश्मा कपूर, मकरंद देशपांडे आदी उपस्थित होते. या वेळी बोलताना गृहमंत्री म्हणाले की, महिलांच्या सुरक्षिततेला आम्ही सर्वोच्च प्राधान्य दिले असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत आहोत. मुंबई पोलिस आयुक्तालयात महिला अत्याचार प्रतिबंधक कक्ष स्थापण्यास मंजुरी दिली असून हा कक्ष लवकरच कार्यान्वित केला जाईल, असेही ते म्हणाले.

मुंबई पोलिसांच्या महिला सुरक्षाविषयक ‘आईस’ या मोबाइल अ‍ॅप्लिकेशनचा वापर करण्याचे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी केले.