आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Within Three Weeks Building Should Be Evacuate High Court

तीन आठवड्यांत इमारत रिकामी करा - उच्च न्यायालय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - परेल परिसरातील दिन या धोकादायक इमारतीत वास्तव्य करणार्‍या नागरिकांना तीन आठवड्यांत बाहेर काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने म्हाडाला दिले आहेत. तसेच इमारतीचे पुनर्निर्माण होईपर्यंत स्थलांतरासाठी येथील रहिवाशांना बिल्डरने वर्षभराचे भाडे पुरवावे, अशा सूचनाही न्यायालयाने दिल्या आहेत. न्यायमूर्ती व्ही. एम कानडे आणि एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी झाली. याप्रकरणी मुंबईस्थित हरे कृष्णा बिल्डर्सने याचिका दाखल केली आहे.
इमारतीतील 70 टक्के रहिवाशांनी पुनर्निर्माण होईपर्यंत इतरत्र स्थलांतराची तयारी दाखवली होती. मात्र उर्वरित 30 टक्के रहिवासी इमारत सोडण्यास तयार नव्हते. या प्रकरणी निर्णय देताना न्यायालयाने म्हाडाला संबंधित रहिवाशांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संबंधित बिल्डरला बांधकाम पूर्ण होईपर्यंत इमारतीतील रहिवाशांना पर्यायी व्यवस्था करण्यासाठी वर्षभराचे भाडे अनामत म्हणून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करणार्‍या नागरिकांबाबत उच्च न्यायालय स्वत: हस्तक्षेप करणार असून अधिकृत मार्गाने त्यांना बाहेर काढले जाईल, असे संकेत मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते.