आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Without Sneak Nagpanchami Celebrating In Batis Shirala

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बत्तीस शिराळ्यातील नागपंचमी सापांशिवायच होणार साजरा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बत्तीस शिराळा (जि. सांगली) येथील पारंपरिक नागपंचमी उत्सव साजरा करण्यास उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. या प्रकरणी दाखल याचिकेची अंतिम सुनावणी 20 ऑगस्ट रोजी होणार आहे. मागील वर्षीही उच्च न्यायालयाने बत्तीस शिराळ्याच्या नागपंचमी उत्सवाला सशर्त परवानगी दिली होती.

नागपंचमीसाठी जिवंत साप, नाग पकडून त्यांची मिरवणूक काढण्याची गेल्या अनेक वर्षांपासून बत्तीस शिराळा येथे प्रथा होती. या दिवशी या सापांची पूजा होते. त्याचे खेळ होतात. तसेच प्रदर्शनही भरवले जाते. मोठय़ा मिरवणुका काढल्या जातात. मात्र बत्तीस शिराळय़ातील या प्रथेमुळे सापांचा छळ होत असल्याचा आक्षेप नोंदवत सर्पप्रेमी अजित पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केलेली आहे. विशेष म्हणजे या पारंपरिक नागपंचीवर गेली अकरा वर्षे तोडगा निघालेला नाही.

यंदा ही याचिका न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. एस. सी. गुप्ते यांच्या खंडपीठासमोर आली. या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार समिती स्थापन केली होती. पण कायदेशीर अडचणी निर्माण झाल्याने या समितीनेही निर्णय घेतला नाही, असे सर्पप्रेमी संघटनेच्या वकील डॉ. दीपा वग्यानी यांनी निदर्शनास आणले.

कायदा न मोडता उत्सव
वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार कोब्रा व धामण जातीचे साप पकडण्यास बंदी आहे. त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती अर्जदारांच्या वतीने न्यायालयाकडे करण्यात आली. मात्र, पंचमी काही दिवसांवर आल्याने या याचिकेवर तातडीने निर्णय घेणे शक्य नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केल

केल
करीत गेल्या वर्षी कोर्टाने दिलेला आदेश कायम राहील, असे आदेश न्यायालयाने दिले. कायद्याचे उल्लंघन न करता नागपंचमी उत्सव साजरा करा, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
सापांना इजा नको
पारंपरिक पद्धतीने नागपंचमीचा सण साजरा करताना जिवंत साप पकडून आणू नका. त्यांचे प्रदर्शन करू नका. त्यांच्या मिरवणुका काढू नका. सापांना इजा होईल, असे वर्तन करू नका. कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.