आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधविक्री; तक्रारीसाठी ‘टोलफ्री’ क्रमांक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गर्भपाताच्या किट्स तसेच कामोत्तेजक औषधांची डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ऑनलाइन विक्री सुरू आहे. यामुळे फक्त मुंबईत २०१३-१४ मध्ये १५ वर्षांखालील १८५ मुलींनी गर्भपात केला आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. या ऑनलाइन कंपन्यांची कार्यालये परदेशात अाहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचा विचार राज्य सरकार करीत असून केंद्राच्या कायद्यात सुधारणा करून राज्याला अधिकार देण्याबबात पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. तसेच प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री करणाऱ्यांिवरोधात तक्रार करण्यासाठी टोलफ्री क्रमांक सुरू करण्यात आल्याचेही खडसे
यांनी सांगितले.

राज्यात गर्भपात किट्स व कामोत्तेजक औषधांची विक्री ऑनलाइन सुरू आहे. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवायच या गोळ्या घेतल्याने आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. कामोत्तेजक औषधेही प्रमाणाबाहेर सेवन केल्याने ती प्राणघातक देखील ठरू शकतात. त्यामुळे अशा औषधांच्या ऑनलाइन विक्रीवर बंदी घालावी अशी मागणी डॉ. मिलिंद माने यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली. वर्षा गायकवाड, भारती लव्हेकर, आशिष शेलार, जयप्रकाश मुंदडा आणि मंगलप्रभात लोढा यांनी आमदारांही उपप्रश्न उपस्थित केले.

शाॅपक्लूज, स्नॅपडीलवर गुन्हे
गर्भपात तसेच कामोत्तेजक औषधांची ऑनलाइन विक्री केल्याने शॉपक्लूज डॉट कॉम तसेच स्नॅपडील वेबसाइटविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. काही कंपन्यांची कार्यालये ही परदेशातही आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतचा कायदा केंद्र सरकारचा आहे. राज्यालाही कारवाई करण्याचे अधिकार मिळावेत, अशी कायद्यात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिण्यात आले असून केंद्राकडून सकारात्मक उत्तर आल्याचेही त्यांनी सांगितले.

डायल करा१८००२२२३६५
मुंबई शहरात २०१३-१४ या वर्षात १५ वर्षांखालील १८५ मुलींचे, १५ ते १८ वयोगटातील १६००, तर १८ वर्षांवरील ३० हजार महिलांचे गर्भपात नोंद करण्यात आल्याची आकडेवाराही खडसे यांनी दिली. प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे विकणे, बनावट औषधे विकणे आदी गैरप्रकार आढळल्यास तक्रार करण्यासाठी १८००२२२३६५ हा टोलफ्री क्रमांक सुरू करण्यात आल्याचेही खडसे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...