आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्ससाठी बनवला व्हिडिओ; करु लागला ब्लॅकमेल, त्यानंतर विवाहितेने उचलेले हे पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मालाड पोलिसांनी विवाहित महिलेचा अश्लील व्हिडीओ बनवून तिला सेक्ससाठी ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक केली आहे. आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीडित महिलेने जेव्हा आरोपीच्या मागण्या धुडकावून लावण्यास सुरुवात केली तेव्हा त्याने महिलेच्या पतीला तो व्हिडीओ पाठवून दिला. आरोपी सरताज शेख विरोधात आयपीसीच्या कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
संसार मोडणार या भितीने घाबरली महिला
पीडित महिला तक्रार दाखल करण्यासाठी आली तेव्हा ती पूर्णपणे कोसळून पडलेली होती. आपला संसार मोडणार या भितीने ती महिला भेदरली होती. महिलेचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आम्ही सरताज शेखला तात्काळ अटक केली अशी माहिती मालाड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. आरोपी शेख 27 वर्षांचा असून पीडित महिला 26 वर्षांची आहे. मागच्या दोन वर्षांपासून दोघे परस्परांना ओळखत होते. 
 
एकत्र होते नोकरीला, त्यामुळे होती ओळख
एका कंपनीत दोघे एकत्र नोकरीला होते. शेखने नोकरी सोडल्यानंतर रिक्षा चालवायला सुरुवात केली. पीडित महिलेकडे स्वत:च्या मालकीची रिक्षा होती. शेखने तिच्याकडून ती रिक्षा भाडयावर चालवायला घेतली होती. तीन महिन्यापूर्वी आरोपी सरताज शेखने पीडित महिलेला फोन करुन रिक्षाच्या काही भागांचे नुकसान झाल्याचे तिला सांगितले. 
 
असा बनवला व्हिडिओ
मला तुझ्या मदतीची गरज आहे असे सांगून त्याने पीडित महिलेला बोलावून घेतले. सरताजला ओळखत असल्यामुळे तिच्या मनात सुद्धा कुठलाही संशय आला नाही. ती सांगितलेल्या पत्त्यावर सरताजला भेटायला गेली. त्यावेळी सरताजने गुंगीचे औषध मिसळून तिला शीतपेय दिले. महिला बेशुद्ध झाल्यानंतर शेखने तिचा अश्लील व्हिडीओ बनवला. 
 
पुढील स्लाईडवर जाणून घ्या काय घडले
बातम्या आणखी आहेत...