आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटांवर भडकल्या होत्या जर्मनीतील महिला, आयुष्यभर घर करून राहिली ही बाब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रतन टाटा.. - Divya Marathi
रतन टाटा..
मुंबई- रतन टाटा यांचा परिचय देण्याची गरज नाही. मात्र, त्यांच्या जीवनातील एक जबरदस्त किस्सा जर्मनीत घडला होता. त्यामुळेच टाटांना तो क्षण कायम प्रेरित करीत आला आहे. टाटा यांच्या कृतीमुळे जर्मनीतील महिला भडकल्या होत्या. पुढे वाचा, काय आहे नेमके प्रकरण...
- रतन टाटा आपल्या बिझनेस डीलसाठी हेमबर्ग (जर्मनी) गेले होते.
- काम संपल्यानंतर ते आपल्या एका मित्रांसमवेत हॉटेलमध्ये गेले होते. तेथे त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली.
- दोघांनी तेथे जेवणाचा आनंद लुटला व पैसे देऊन ते तेथून उठू लागले. त्यावेळी समोर काही महिला बसल्या होत्या.
- त्या महिला टाटा आणि त्यांच्या मित्राकडे रागाने पाहू लागल्या व काहीतरी पुटपुटल्या. मात्र, या दोघांना फारसे काही कळाले नाही.
- त्या महिला जेवणानंतर राहिलेल्या पदार्थाबाबत बोलत असाव्यात असे या दोघांना वाटले.
- त्यानंतर या दोघांनी सांगितले की, या जेवणासाठी त्यांनी पुरेपूर पैसे दिले आहेत.
- यानंतर या महिला आणखी भडकल्या आणि त्यांनी एका नंबरवर फोन लावून एका सामाजिक संस्थेच्या लोकांना बोलवून घेतले.
टाटांना भरावा लागला दंड...
तेव्हा त्या सामाजिक संस्थेच्या लोकांनी टाटांना सांगितले की, तुम्ही भलेही जेवणाचे पैसे भरले असतील. मात्र, हे जेवण देशाची संपत्ती आहे, तुमची नाही. या पदार्थाला खराब करणे किंवा ते फेकून देणे याचा हक्क तुम्हाला दिलेला नाही. तुम्हाला जेवढे हवे तेवढेच ऑर्डर करत जा. रतन टाटांना यासाठी 200 डॉलर दंड करण्यात आला. ही घटना टाटांच्या मनात घर करून गेली. ज्या देशाचे नागरिक इतके सभ्य व उच्च विचारसारणीचे आहेत म्हणूनच हा देश विकसित होऊ शकला.
जेथे हात घातला तेथे यश मिळाले-
ही गोष्ट 1971 मधील आहे. नेल्कोची स्थिती खूपच खराब होती. तोटा 40 टक्क्याच्या घरात होता आणि यापुढे कंपनी चालवणे अवघड असल्याची जाणीव जेआरडी टाटांना झाली. अशावेळी जेआरडींनी रतन टाटांना नेल्कोचे डायरेक्टर बनविले. रतन टाटांनी या कंपनीच्या कारभारात लक्ष घालताच कंपनी नफ्यात आली. रतन टाटा यांनी टाटा ग्रुपला जितक्या ऊंचीवर घेऊन जाऊ शकले तितके कोणीही वर नेले नाही. रतन टाटांच्या कालखंडात टाटा ग्रुपचा 65 टक्के नफा परदेशातून येत असे.
पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, रतन टाटांची निवडक PHOTOS...