आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NRI पत्नीचे तीन तुकडे करून मृतदेह ठेवला फ्रीजमध्ये, मुंबईतील घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील मीरा रोड भागात मंगळवारी सायंकाळी एक एनआयआर महिलेचा मृतदेह तीन तुकडे केलेल्या अवस्थेत आढळून आला. मृत महिलेचे नाव मधुवंती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती गिरीश कोटे याने आपल्या पत्नीचा खून केला आहे. भाईंदर पूर्व गोल्डन नेस्ट परिसरातील नक्षत्र इमारतीत माधव-मधुमती राहत होते. अनैतिक संबंधामुळे ही हत्या झाल्याची शक्यता आहे.
खून केल्यानंतर मृतदेहाची त्याला विल्हेवाट लावायची होती पण तशी संधीच मिळत नव्हती. त्यामुळे अखेर तिच्या शरीराचे तीन भागात तुकडे केले व फ्रीजमध्ये ठेवले. दोन दिवसानंतर त्याने आतेभावाला फोन करून याबाबत माहिती दिली व मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत कर अशी विनंती केली. मात्र, त्याने त्याचे न ऐकता एक सुजाण नागरिकांची भूमिका बजविताना पोलिसांत जावून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घर गाठले व फ्रीज उघडला तर मधुवंतीच्या मृतदेहाचे तीन तुकडे केलेले शरीर एका पॉलिथिन पिशवीत भरून ठेवल्याचे आढळून आले. या हत्येचे कारण कौटुंबिक वाद असल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले असून, सर्व बाबी लक्षात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
दोन महिन्यापूर्वी अशीच घटना आली होती पुढे, आणखी पुढे वाचा....