आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीएसटी रेल्वेस्थानकात महिलेची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) रेल्वे स्थानकावरील डीएससी कार्यालयाच्या बाथरूममध्ये एका महिलेने जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.
सीएसटी स्थानकावर गुरुवारी नेहमीप्रमाणे वर्दळ होती. या वेळी अचानक डीएसीच्या कार्यालयातून एक महिला आगीत होरपळत असल्याचे प्रवाशांना निदर्शनास आले. त्यानंतर स्थानकावरील आरपीएफ आणि जीआरपीच्या जवानांनी आग विझवत महिलेला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत महिलेची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.