आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टाॅपवर बसची वाट पाहत होती ही महिला, काही क्षणातच असा झाला मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंगावर झाड पडल्याने मृत्यू झालेली महिला. - Divya Marathi
अंगावर झाड पडल्याने मृत्यू झालेली महिला.

मुंबई- चेंबूर डायमंड गार्डन भागात झाड अंगावर कोसळून कामावर जाणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. शारदा घोडेस्वार असे मृत महिलेचे नाव आहे. झाड पडून मृत्यू होण्याची चेंबूरमधील ही दुसरी घटना आहे.
 

नेमके काय घडले?

- शारदा घोडेश्वर (वय 45) या सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कामावर जाण्यासाठी निघाल्या होत्या. डायमंड गार्डन परिसरातील स्टॉपवर त्या बसची वाट पाहत उभ्या होत्या. त्याचवेळी रस्त्यावरील एक झाड त्यांच्या अंगावर पडले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. जखमी शारदा यांना लगेचच शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

- गोवंडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत माने यांनी सांगितले की, ही महिला घरकाम करायची. ती आपल्या पती आणि तीन मुलांसह पांजरपोळ भागात राहत होती.

-  काही महिन्यांपूर्वी चेंबूरमधील स्वस्तिक पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दुरदर्शनच्या अँकर कांचन नाथ यांचा अंगावर झाड पडून असाच मृत्यू झाला होता.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...