आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Driving Drunk Hits Tea Vendor A Car And A Parked Rickshaw

मुंबईत फॅशन डिझायनर गुजराती तरूणीने दारू पिऊन मध्यरात्री एकाला उडवले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो- निधी पारेख... - Divya Marathi
फाईल फोटो- निधी पारेख...
मुंबई- मुंबईत दारूच्या नशेत आणखी एका महिलेने मंगळवारी मध्यरात्री 2.30 वाजता अपघात केला. या अपघातात चहा विक्री करणारा एक स्टॉलधारक जखमी झाला आहे. निधी पारेख असे या महिलेचे नाव असून, ती फॅशन क्षेत्राशी संबंधित आहेत. निधीने मध्यरात्री दारू पिऊन एका फुटपाथवर चढवली. पोलिसांनी सांगितले की, निधी पारेख दारू पिऊन आपली शेवरलेट कार गाडी चालवत होती. त्यावेळी वांद्रे परिसरातील कार्टर रोडवर तिचे कारवरील नियंत्रण सुटले व गाडी फुटपाथवर गेली. तेथे कडेला एका चहा स्टॉलला धडक दिली व त्यात स्टॉलधारक चहा विक्रेता गंभीर जखमी झाला आहे. रिलायन्समध्ये व्हाईस प्रेसिडेंट (लीगल) पदावर काम करणा-या जान्हवी गडकर हिने मागील महिन्यात अशाच प्रकारे दारू पिऊन आपली ऑडी कार टॅक्सीला धडकवली होती. त्यात दोघांचा मृत्यू झाला होता.
अपघातानंतर निधी पारेखने कारमध्येच स्वत:ला लॉक करून घेतले-
25 वर्षाची निधी विले पार्ले (ईस्ट) मधील एका गुजराती कॉलनीत राहते. आपल्या मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करून ती घराकडे चालली होती. वांद्रेतील कार्टर रोडवर येताच तिचे गाडीवर नियंत्रण सुटले व कार थेट फुटपाथवर चढली. या घटनेनंतर लोकांची तिथे गर्दी झाली. त्यामुळे घाबरून निधी पारेखने कॉरमध्ये स्वत:ला लॉक करून घेतले. काही वेळातच तेथे पोलिस पोहचले व तिला बाहेर येण्यास सांगितले. मात्र, निधी दरवाजा उघडत नव्हती. अखेर पोलिसांनी एका स्थानिक की-मेकरच्या मदतीने तिला गाडीतून बाहेर काढले.
वैद्यकीय तपासणीत दारू पिल्याचे निष्पन्न-
पोलिसांनी निधी पारेखला रात्री साडेतीनच्या सुमारास कारमधून बाहेर काढल्य़ानंतर तिला रूग्णालयात नेले. तसेच तिच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. तेथे तिच्या रक्तात अल्कोहोलचे प्रमाण आढळून आले. सोबत महिला पोलिस नसल्याने त्या रात्री निधीला घरी जाण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर मंगळवारी दुपारी पोलिस ठाण्यात आणले व अटक केली.
अटक होण्यापासून वाचण्यासाठी दुस-यादा आणखी एका महिलेने कॉरमध्येच लॉक करून घेतले-
निधी पारेख डिझायनर क्रिस्टे डे चुन्हा हिच्याकडे मुख्य फॅशन को-ऑर्डिनेटर म्हणून काम करते. आपल्याला माहित असेलच की, मागील आठवड्यात दारू पिऊन गाडी चालवणा-या महिलेला पोलिसांनी जेव्हा पकडले तेव्हा त्या महिलेने मध्यरात्री स्वतला दोन तास कॉरमध्येच लॉक करून गाणी ऐकत बसली होती. अटक टाळण्यासाठीच हे प्रकार केला होता. शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण कमी होण्यासाठी ही हुशारी केली जाते.
पुढे छायाचित्राच्या माध्यमातून पाहा, निधी पारेखने केलेला अपघात व मागील महिन्यातील मुंबईतील DRUNK & DRIVE ची प्रकरणे...