आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Held For \'sexually Assaulting\' Minor Teen

मुंबई: 40 वर्षीय महिलेने मुलाच्या मित्राला बनवले आपल्या वासनेचे शिकार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील चेंबूरमधील वाशीनाका परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 40 वर्षीय महिलेने आपल्या मुलाच्या मित्रावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे. महिलेच्या वासनेला शिकार पडलेल्या मुलाने व त्यांच्या पालकांनी संबंधित महिलेविरूद्ध चेंबूरमधील आरसीएफ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. बाल अत्याचार कायद्याखाली महिलेवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. बाल लैंगिक अत्याचार कायदा अस्तित्वात आल्यानंतर एखाद्या महिलेविरूद्ध दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत माहिती अशी की, पिडीत मुलगा हा 16 वर्षाचा असून, चेंबूरमधील वाशी नाका परिसरात राहतो. त्याचा एक वर्गमित्र त्याच परिसरात राहतो. या दोघांत मैत्री झाल्याने त्यांचे एकमेंकाच्या घरी येणे-जाणे सुरु झाले. शाळेत एकत्रच जाणे व घरी परतल्यावर एकत्र खेळणे असा त्याचा दिनक्रम असे. मात्र, तीन महिन्यापूर्वी आपल्या मुलाला बाहेर लावून संबंधित महिलेने पीडित मुलाला घरी बोलावले. पीडित मुलाला काम असल्याचे सांगून बोलावून घेतले. त्यानंतर त्याला नाश्ता दिला व त्यासोबत शितपेयही दिले. त्यानंतर पीडित मुलगा बेशुद्ध पडला. संबंधित महिलेने शितपेयात गुंगीचे औषध टाकून ठेवले होते.
मुलाची शुद्ध हरपताच महिलेने त्याच्याशी लैंगिक चाळे सुरु केले व तो घटनाक्रम मोबाईलमध्ये शुट करून क्लिप बनवली. त्यानंतर महिलेने त्या मुलास तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. या महिलेने त्याला मोबाईलमधील आक्षेपार्ह क्लिक दाखविली. तू कोणाला सांगितले तर मी पोलिसात तक्रार देईल असे सांगत त्याला धमकावले. त्यानंतरही त्याला धमकी देऊन त्याच्याशी ती रोजच संबंध ठेवू लागली.
मागील तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. दरम्यान, हा मुलगा तणावाखाली राहू लागला. त्यामुळे त्याच्या घरच्यांनी अधिक चौकशी केला असता तो संबंधित महिलेच्या घरी सारखा घरी ये-जा करीत असल्याचे दिसले. त्यानंतर त्याच्या पालकांनी त्याचे फोन कॉलिंग रेकॉर्ड तपासल्यानंतर पालकांच्या हा प्रकार लक्षात आला. मुलांकडे नीट चौकशी केली असता त्याने महिलेने धमकी देऊन लैंगिक अत्याचार केल्याचे मुलाने सांगितले. यानंतर त्या महिलेविरोधात चेंबूरमधील आरसीएफ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांनी दोन-तीन दिवस वेळ घेवून व चौकशी केल्यानंतर बुधवारी रात्री संबंधित महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला व गुरुवारी सकाळी तिला अटक केली. तिला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी महिलेने यापूर्वी आपल्या पतीच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे सध्या ही महिला आपल्या 15 वर्षाच्या मुलासोबत वाशीनाका परिसरात एकटीच राहते.
पुढे वाचा, घटनेची दुसरी बाजू, संबंधित मुलगा मर्जीने राहत असल्याचा महिलेचा दावा..