आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेडी फोटोग्राफरने कॅप्चर केले Photos, दाखवली भारतीय महिलांची Life

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत राहणाऱ्या महिला फोटोग्राफर दीप्ति आस्थानाने फोटो सिरीजच्या माध्यमातून भारतातील ग्रामीण महिलांच्या जीवनाला दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. वुमन ऑफ इंडिया (WOI) नामक पर्सनल प्रोजेक्टसाठी त्यांनी अनेक वर्षांपासून देशाच्या वेगवेगळ्या भागांचा दौरा केला आणि महिलांशी बोलून त्यांच्या परिस्थितीबद्दल जाणून घेतले.
 
काय म्हणतेय फोटोग्राफर...
दीप्तीने सांगितले की, मी एक सेल्फ लर्नर फोटोग्राफर आहे आणि लहान वयातच मला फोटोग्राफीचा छंद जडला. म्हणून, जेव्हा त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरू केले, तेव्हाच फोटोग्राफीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. सामाजिक विषयांचे फोटो काढून त्यांनी फोटोग्राफीची सुरुवात केली. आणि आपल्या दीर्घ काळ चालणाऱ्या प्रोजेक्टचे नाव ठेवले वुमन ऑफ इंडिया.
 
महिल्यांच्या अडचणी सोडवण्याचे उद्दिष्ट
आपल्या प्रोजेक्टबाबत दीप्ती म्हणाल्या, हा माझा वैयक्तिक प्रोजेक्ट आहे. यासाठी मी ग्रामीण भारताची निवड केली आहे. भारतीय महिलांची दयनीय अवस्था असल्याचे त्या मानतात. खासकरून ग्रामीण भागात महिलांना जास्त अडचणींना तोंड द्यावे लागते, असेही त्या म्हणाल्या.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, फोटोजमधून ग्रामीण महिलांची फोटोग्राफरने टिपलेली Life... 
बातम्या आणखी आहेत...