आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिला बचत गटांना हवे शॉपिंग मॉलमध्ये आरक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महिला बचत गटांना त्यांची उत्पादने विकण्यासाठी शॉपिंग मॉलमध्ये आरक्षित जागा द्यावी, अशी मागणी रिपाइं नेते रामदास आठवले यांनी केली आहे. उत्पादनांना बाजारपेठ नसल्यामुळे बचत गटांच्या महिलांना उदरनिर्वाह चालवणे अवघड होऊन बसले आहे. त्यांना उत्पादने विक्रीसाठी मॉलमध्ये आरक्षित जागा दिल्यास त्यांची मिळकत वाढेल, असे आठवले म्हणाले. आठवलेंची मागणी चांगली आहे. मॉलमध्ये पुरेशी जागा असल्याने बचत गटांना चार बाय चारची जागा सहज देता येणे शक्य आहे, असे भाजपच्या प्रवक्त्या शायना एन. सी. म्हणाल्या.
बातम्या आणखी आहेत...