आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या सुंदर महिलेने शोरुममध्ये केलेले हे कृत्य पाहून तुमचा विश्वासच बसणार नाही!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील फेमस फॅशन डिझायनर एमी बिलिमोरियाच्या शोरुममध्ये एक हायप्रोफाइल महिला चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे.  मिळालेली माहिती अशी की, महिलेने शोरूममध्ये ठेवलेली गोल्ड इअरिंग लांबवल्या आणि पसार झाली. मात्र, हा हायप्रोफाइल चेहरा कॅमेर्‍यात कैद झाला आहे. पो‍लिस महिलेचा शोध घेत आहेत.

नेमकं काय आहे हे प्रकरण?
- मुंबई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सांताक्रुज भागातील फेमस फॅशन डिझायनर एमी बिलिमोरियाच्या शोरूममध्ये काल (बुधवारी) ही चोरी झाली.
- 13 सप्टेंबरला सकाळी ब्लू टॉप परिधान केलेली महिला शोरुममध्ये आली. सेल्स गर्लला तिने ड्रेस दाखवायला सांगितला.
- सेल्स गर्लने तिला अ‍नेक ड्रेस दाखवले. परंतु तिने एकही पसंत केला नाही. 'आणखी काही वेगळं दाखवा,' म्हणाली.
- सेल्स गर्ल दुसरे ड्रेस घेण्यासाठी बाजुला झाली असता. चोरट्या महिलेने शोकेसमध्ये ठेवलेली गोल्ड इअरिंग आपल्या बॅगेत ठेवल्या.
- चोरीची ही घटना स्टोअरमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. चोरी झाली तेव्हा डिझायनर एमी बिलिमोरिया या स्टोअरमध्ये नव्हत्या.
- सायंकाळी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली.
- एमी बिलिमोरिया यांच्या तक्रारीनंतर सांताक्रूज पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.
- पोलिस चोरट्या महिलेचा शोध घेत आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... या घटनेशी संबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...