आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्यात महिलेने 2 गतीमंद मुलांचा खून करुन केली आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये सांगितले कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ठाण्यातील खारेगाव येथे जुळ्या गतिमंद मुलांचा खून करून आईने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गतिमंद मुलांना कंटाळून या महिलेने हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.

आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव अर्चना कदम (32) असून खारेगाव रेल्वे फाटकाजवळील 13 क्रमांकाच्या इमारतीत हा प्रकार घडला आहे. सार्थक आणि वरद या मुलांची हत्या करून या महिलेने आत्महत्या केली.

दरम्यान, या घटनेबाबत माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी त्यांना 'सुसाइड नोट' मिळाली आहे. आपली मुले गतिमंद असल्याने त्याला कंटाळून मी त्यांचे व स्वत:चे जीवन संपवत असल्याचे या नोटमध्ये लिहिण्यात आले आहे. या मुलांचे वडील एका खासगी कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतात.
बातम्या आणखी आहेत...