आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हाजी अलीच्या दर्ग्याच्या मझारपर्यंत महिलांची धडक, मझारपर्यंत जाऊन घेतले दर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली दर्गाहमध्ये मंगळवारी महिलांनी मझारपर्यंत जाऊन दर्शन घेतले अाणि समान हक्कांसाठी सुरू असलेल्या लढाईची यशस्वीपणे सांगता झाली. गेली चार वर्षे या प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. मध्यंतरी ट्रस्टने महिलांना मझारपर्यंत जाऊ देण्यास हरकत नसल्याचे न्यायालयात सांगितले होते. मंगळवारी जेव्हा काही महिला दर्गाहमध्ये गेल्या तेव्हा ट्रस्टतर्फे चहा देऊन त्यांचे स्वागत केले.

सन २०१२ मध्ये हाजी अली दर्गाह ट्रस्टने महिलांना दर्गाहच्या मझारपर्यंत प्रवेश करण्यास प्रतिबंध केला होता. त्याविरोधात भारतीय महिला मुस्लिम संघटनेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. मुंबई उच्च न्यायालयाने महिलांना मझारपर्यंत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दर्गाह ट्रस्टने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच ट्रस्टने महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. तसे प्रतिज्ञापत्रक सर्वोच्च न्यायालयात सादरही केले. भारतीय महिला मुस्लिम संघटनेच्या प्रमुख असलेल्या नूरजहांॅ सफिया नियाज तसेच जकिया सोमण, खातून शेख यांच्यासहित सुमारे शंभर महिलांनी मंगळवारी हाजी अली दर्गाहच्या मझारपर्यंत जाऊन दर्शन घेतले व प्रार्थना केली.

सकारात्मक बदलामुळे अानंद : नियाज
हाजी अाली दर्ग्यातील मझारपर्यंत आज महिलांना प्रवेश देण्यात आला. आम्ही या निर्णयाने खुश आहोत. हा सकारात्मक बदल आहे. ट्रस्टी दोन पावले पुढे आले आहेत, आम्ही त्यांचे स्वागत करतो, असे मुस्लिम महिला आंदोलनच्या नूरजहाँ सफिया नियाज यांनी सांगितले. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक,बंगाल, आंध्र प्रदेश अशा विविध राज्यांतून आजच्या या ऐतिहासिक प्रवेशास महिला उपस्थित होत्या. ‘अगोदर कळवले असते, तर जेवणाची सोय केली असती, असे ट्रस्टींनी या महिलांना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...